Akhilesh Yadav on Zeeshan Siddique : दुपारी दोन वाजता उठता, हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या; मुंबई काँग्रेसने झिशान सिद्दिकींना सुनावलं
Akhilesh Yadav, Mumbai : बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनीही बंडाची भाषा सुरु केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाने झिशान यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली होती.
Akhilesh Yadav, Mumbai : बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनीही बंडाची भाषा सुरु केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाने झिशान यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली होती. दरम्यान, झिशान यांनी मुस्लिम असल्याने काँग्रेस पक्षात माझ्यावर अन्याय झाला, असा आरोप केला होता. झिशान यांच्या आरोपांना मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अखिलेश यादव म्हणाले, झिशान सिद्दिकी यांच्यात हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा देतील. सर्व धर्मीय लोक या काँग्रेस पक्षात आहेत. झिशान सिद्दिकी हा दुपारी दोन वाजता, झोपेतून उठतो तर, अश्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाने आमदार केले.
पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले, मुंबई युथ काँग्रेसचे काम आहे की, मुंबईतील युवकांचे प्रश्न लावून धरणे. पुढच्या काही दिवसांत मुंबईतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहे. सिद्दीकी यांना, काँग्रेस पक्षामुळे ओळख मिळाली. त्यांनी त्यांच्या ऑफिसवरील काँग्रेस पक्षाचा लोगो हटवला आहे. झिशांत सिद्धिकी हा राहुल गांधी यांची यात्रा मुंबईत येईल त्यावेळी तो NCP मध्ये पक्ष प्रवेश करणार आहे आशी माहिती आम्हाला मिळत आहे, असा खुलासाही यादव यांनी केला.
झिशान सिद्दिकींचे काँग्रेसवर गंभीर आरोप
युवक काँग्रेसमध्ये सर्वाधिक धार्मिक भेदाभेद होतोय, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केला होता. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यावर आपण मुस्लीम असल्याने आपल्याला प्रचंड त्रास दिला, असं झिशान यांनी म्हटलं होतं. काँग्रेसला आपली गरज नसेल तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल असं सिद्दिकी म्हणाले.
झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी
काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. काँग्रेस (Congress) पक्षाकडून मंगळवारी याबाबतचे पत्र जारी करण्यात आले होते. त्यानुसार मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची निवड करण्यात आली आहे. तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या