Mumbai North-East Loksabha : मुंबईतील लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आक्रमक, समीर भुजबळांची निवडणूक लढवण्याची तयारी
Mumbai North-East Loksabha : मुंबईतील लोकसभेची एक जागा मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.
Mumbai North-East Loksabha : मुंबईतील लोकसभेची एक जागा मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईशान्य मुंबईची (Mumbai North-East Loksabha) जागा आपण लढवावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाची लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठांकडे ही मागणी करण्यात आली. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गटाकडून समीर भुजबळ आणि सिद्धार्थ कांबळे इच्छुक
मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत. ईशान्य मुंबईतून (Mumbai North-East Loksabha) समीर भुजबळ आणि सिद्धार्थ कांबळे इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांनी पक्षवाढीसाठी कल्याणमधील कार्यकर्त्यांनी बळ दिले होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी कल्याणमध्ये सभा घेतली होती. आता मुंबईतील एक जागा मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळतोय.
ईशान्य मुंबई भाजपचा बालेकिल्ला
ईशान्य मुंबईचा लोकसभा मतदारसंघ (Mumbai North-East Loksabha) भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिल आहे. 2009 मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांना या मतदारसंघातून (Mumbai North-East Loksabha) पराभव पत्कारावा लागला होता. दरम्यान, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिलंय. 2009 मध्ये पराभव झाल्यानंतर 2014 मध्ये सोमय्या तयारीनिशी मैदानात उतरले. मोदी लाटेत सोमय्या यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सोमय्या यांचा पत्ता कट केला.
महायुतीकडून कोणाला मिळणार जागा
भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांची युती असल्यामुळे यादी जाहीर करणे भाजपने टाळले आहे. आज गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाहांचा दौऱ्यावेळी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. अमित शाहांकडे मुंबईतील जागेवर अजित पवार आग्रह धरणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईची जागा कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अजित पवार गट ईशान्य मुंबईच्या (Mumbai North-East Loksabha) जागेसाठी आग्रह धरताना दिसतोय.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar: अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले, मनात किंतू बाळगू नका, आता आमच्यात सगळंच फाटलंय!