Ajit Pawar : पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, भूमिका बदलणार नाही : अजित पवार
मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या, अशा सूचना अजित पवारांनी बैठकीत दिल्या आहेत.
मुंबई : आता आपण पुढे गेलो आहोत, कुठेही मॅचफिक्सिंग नाही, आपण भूमिका घेतलीये, त्यामध्ये बदल होणार नाही, असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या बैठकांच आयोजन करण्यात आलं होतं. तसेच आता आपण जी भूमिका घेतली आहे, त्यावर ठाम राहायचं असं देखील अजित पवारांनी म्हटलं.
मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या. कारण लोकसभेनंतर चार महिन्यातच विधानसभा लागणार आहेत, अशा सूचना देखील अजित पवारांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्रालयाजवळील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादींच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे देखील उपस्थित होते.
कोणालाही फसवायचे नाही - अजित पवार
आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्याला हेच वाटतं की आम्ही एकच आहोत. कशाला वाईटपणा घ्यायचा असं वाटत असेल तुम्हाला, पण आता आपण पुढे आलो आहोत. कुठेही कसलीही मॅचफिक्सिंग नाही. आता आपल्याला कोणालाही फसवायचं नाहीये. जी भूमिका घेतलीये, त्यात आता कोणताही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं अजित पवारांनी म्हटलं.
आपल्या लोकसभेच्या सर्वाधिक जागा - अजित पवार
मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या , लोकसभा नंतर लगेच चार महिन्यात विधानसभा आहे. आता लोकसभा महत्वाची आहे. पण निवडणुकांनंतर विधानसभेचीही तयारी करायला हवी. आपण लोकसभेच्या सर्वाधिक सहा- नऊ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, अशा सूचना देखील अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आग विझवायचं काम करा - अजित पवार
बोलताना आणि चर्चा करताना महायुती मित्र पक्ष म्हणून नाराज होणार नाही,याची काळची घ्या. कुठमित्र पक्ष चुकत असेल तर आम्हास सांगा. पण महायुतीत अंतर पडेल किंवा गैरसमज होईल, असं काही वागू नका. कोणी विचारल तर वरिष्ठ निर्णय घेतील असंच बोला. आगा लावण्याचा प्रयत्न कोणीही करुन नका. कोणी प्रयत्न करत असेल तर वाद वाढवायच्या ऐवजी विझवायचं काम करा,अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.
'दबक्या आवाजात चर्चा होतात'
अनेक वेळा वरिष्ठांनी इतर पक्षांशी संधान साधण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो. वयोमाना प्रमाणे नवी पिढी पुढे येत असते. त्यांना मार्गदर्शन करावं लागतं मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते. काही जण जाणीवपूर्वक सांगतायत की हे कमळावर लढणार आहेत असं काही नाही. आपल्याला गद्दारी , मॅच फिक्सिंग करायची नाही, असं अजित पवारांनी म्हटलं.