एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गर्भवतीला व‍िमानात चढण्यास रोखलं, एअर इंडिया पुन्हा वादात

डोंबिवलीच्या मानपाडामध्ये राहणारे व्यावसायिक रजनीकांत चतुर्वेदी यांच्या माहितीनुसार, "सोमवारी पत्नीसोबत मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट खरेदी केलं होतं."

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक गर्भवती, तिचा पती आणि दोन प्रवाशांना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चढण्यास मज्जाव केला. हे प्रवासी मुंबईहून नागपूरला जात होते. डोंबिवलीच्या मानपाडामध्ये राहणारे व्यावसायिक रजनीकांत चतुर्वेदी यांच्या माहितीनुसार, "सोमवारी पत्नीसोबत मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट खरेदी केलं होतं." "माझ्या तिकीटाचा नंबर 0985318448384 आणि पत्नीच्या तिकीटाचा नंबर 0985318448383 असा आहे. विमान पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण करणार होतं. त्यामुळे आम्ही 4 वाजून 55 मिनिटांनी विमानतळावर पोहोचलो. आमच्यासोबत आणखी एक-दोन प्रवासी होते. आम्ही बोर्डिंग पाससाठी संबंधित काऊंटरवर पोहोचलो, पण काऊंटर बंद असल्याचं कारण देत, आम्हाला विमानात चढण्यास मज्जाव केला," असा आरोप रजनीकांत चतुर्वेदी यांनी केला आहे. बोर्डिंग पास देण्याची विनंती त्यांच्यासोबत असलेल्या इतर महिलांनीही एअर इंडियाच्या कर्माचाऱ्यांना बोर्डिंग पास देण्याची विनंती केली. पण त्यांनी ऐकलं नाही. अखेर तीन-चार तास माथेफोड केल्यानंतर रजनीकांत तसंच सहप्रवाशांना आपला प्रवास रद्द करुन घरी परतावं लागलं. रजनीकांत यांच्या पत्नी सरकारी क्षेत्रात काम करतात आणि ड्यूटीवर जॉईन करण्यासाठी पतीसोबत नागपूरला जात होत्या. गैरवर्तनाचा आरोप रजनीकांत यांनी एअर इंडियाचे सिक्युरिटी इन्चार्ज दीपक पाटील यांच्यावर महिलांशी गैरवर्तनाचा आरोप केला. याबाबत रजनीकांत यांनी दीपक पाटलांविरोधात एअरपोर्ट पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. "पण हे गुन्हेगारी प्रकरण असून त्यांनी एअर इंडिया प्रशासनाकडे तक्रार करावी किंवा ग्राहक फोरममध्ये जावं," असं पोलिसांनी रजनीकांत चतुर्वेदी यांना सांगितलं. हेल्पलाईनकडून ‘नो रिस्पॉन्स’ "एयर इंडिया कर्मचाऱ्यांची वागणूक आणि वेळ असूनही बोर्डिंग पास न दिल्याची तक्रार करण्यासाठी एअर इंडिया हेल्प डेस्कच्या नंबर आणि फीडबॅक सेंटरमध्ये मेल आणि फोन केले. पण एअर इंडिया प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही," असं रजनीकांत यांनी सांगितलं. मात्र एअर इंडियाचे प्रवक्ते प्रवीण भटनागर म्हणाले की, "एअर इंडिया प्रशासनाचं प्रवाशांच्या तक्रारींवर लक्ष असतं."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget