एक्स्प्लोर
दीपक सावंतांचा राजीनामा, एकनाथ शिंदेंकडे आरोग्य खात्याचा पदभार
दरम्यान, "मी पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रिया दीपक सावंत यांनी एबीपी माझा'ला दिली.

मुंबई : डॉ. दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या आरोग्य खात्याचा पदभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कालावधी संपून 7 जानेवारीला म्हणजेच आज सहा महिने होत असल्याने त्यानंतर ते मंत्रिपदी राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दीपक सावंत राजीनामा देणार, रिक्त मंत्रिपदासाठी सेनेचं लॉबिंग दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु होतं. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. शिवसेनेने यावेळी दीपक सावंतांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिलेली नव्हती, त्यांच्या जागी विलास पोतनीस हे आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे दीपक सावंत सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. नियमानुसार कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना सहा महिन्यांपर्यंत मंत्रिपदी राहता येते. त्यानंतर पुन्हा जर मंत्रिपद हवं असेल, तर राजीनामा देऊन नव्याने शपथविधी करावा लागतो.
विधानपरिषदेची संधी डावलल्याने दीपक सावंत शिवसेनेवर नाराज?
दरम्यान, "मी पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रिया दीपक सावंत यांनी एबीपी माझा'ला दिली. काँग्रेसतर्फे रणपिसे, वजाहत मिर्झांना विधानपरिषदेचं तिकीटआणखी वाचा























