एक्स्प्लोर
इमानचं वजन पाचशेहून 171 किलोंवर, डॉक्टरांचा दावा

मुंबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र ती सध्या खूप आजारी आहे, शिवाय डॉक्टर तिची कोणतीही काळजी घेत नाहीत, हा इमानच्या बहिणीने केलेला आरोप डॉक्टरांनी फेटाळला आहे. इमानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून तिची काळजी घेतली जात आहे. शिवाय तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली असून तिचं वजन 500 किलोंहून 171 किलोंवर आलं आहे, असा दावा डॉ. मुझफ्फल लकडावाला यांनी 'माय मेडिकल मंत्र' या वेबसाईटशी बोलताना केला.
इमानला रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयाने तिला दाखल करुन घेताना तिचं वजनही करुन घेतलं नाही. आणि केलं असेल तर त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान इमानची बहिण शायमा यांनी दिलं होतं. शायमांचं आव्हान स्वीकारत डॉक्टरांनी तिचं सध्याचं वजन करुन दाखवलं. शिवाय तसं पत्रही डॉ. लकडावाला यांनी दिलं आहे. इमानसाठी शक्य ते प्रयत्न केले, मात्र शायमा यांच्या आरोपांमुळे दुःखी असल्याचंही डॉक्टर म्हणाले. उपचारासाठी इजिप्तहून 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या इमानचे वजन आधी 500 किलो होतं. पण आता त्यात 262 किलोंची घट होऊन अवघ्या 238 किलोंवर आलं. लकडावाला यांनी आधी इमानच्या डाएटमध्ये बदल करत तिचं वजन 100 किलोंनी कमी केलं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन आणखी वजन कमी करण्यात यश आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. संबंधित बातम्या :
इमानला रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयाने तिला दाखल करुन घेताना तिचं वजनही करुन घेतलं नाही. आणि केलं असेल तर त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान इमानची बहिण शायमा यांनी दिलं होतं. शायमांचं आव्हान स्वीकारत डॉक्टरांनी तिचं सध्याचं वजन करुन दाखवलं. शिवाय तसं पत्रही डॉ. लकडावाला यांनी दिलं आहे. इमानसाठी शक्य ते प्रयत्न केले, मात्र शायमा यांच्या आरोपांमुळे दुःखी असल्याचंही डॉक्टर म्हणाले. उपचारासाठी इजिप्तहून 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या इमानचे वजन आधी 500 किलो होतं. पण आता त्यात 262 किलोंची घट होऊन अवघ्या 238 किलोंवर आलं. लकडावाला यांनी आधी इमानच्या डाएटमध्ये बदल करत तिचं वजन 100 किलोंनी कमी केलं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन आणखी वजन कमी करण्यात यश आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. संबंधित बातम्या : इमान अहमदचं वजन कोणत्याही सर्जरीविना 100 किलो घटलं
इमान अहमदचं तब्बल 262 किलो वजन घटलं!
प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर खोटं बोलले, इमानच्या बहिणीचा आरोप
Before You Go
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज






















