मुंबईत विनामास्क फिरणाऱ्य़ा 20 लाख लोकांवर कारवाई, 40 कोटींचा दंड वसूल
मुंबईत रविवारी 3775 नवे कोरोनाबाधित आढळून आहे. ज्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 3,62,654 वर पोहोचला आहे.
![मुंबईत विनामास्क फिरणाऱ्य़ा 20 लाख लोकांवर कारवाई, 40 कोटींचा दंड वसूल Action taken against 20 lakh people for without mask in mumbai, 40 crore rs fine recovered मुंबईत विनामास्क फिरणाऱ्य़ा 20 लाख लोकांवर कारवाई, 40 कोटींचा दंड वसूल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2020/12/24172436/mask4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Corona Update | महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. सरकार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे कशी कमी करता येतील यासाठी सरकारने एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून लोकांकडून त्याचे पालन व्हावे यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाचा प्रयत्न असा आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळत कमीत कमी लोक घराबाहेर पडावेत. जे घराबाहेर पडत आहेत त्यांनी मास्क घालणे गरजेचं आहे. मात्र काही जण मास्क न लावताच घराबाहेर पडत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मास्क न घालता बाहेर पडलेल्या सुमारे 20 लाख लोकांवर कारवाई केली आहे. नियमांच उल्लंघन करणाऱ्या या लोकांकडून सुमारे 40 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग कसा रोखायचा याचा शोध घेण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. अशात नागरिकांनीही कोरोनासंबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे.
Maharashtra Corona Cases Update | राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा चढता आलेख; आज आढळले इतके रुग्ण...
मुंबईत रविवारी 3775 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत रविवारी 3775 नवे कोरोनाबाधित आढळून आहे. ज्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 3,62,654 वर पोहोचला आहे. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. ज्यामुळं मृतांचा एकूण आकडा 11582 वर पोहोचला. 10 रुग्णांपैकी 7जण कोमॉर्बिड रुग्ण होते. मागील 24 तासांमध्ये 1647 रुग्णांनी कोरोनावर मात केली. ज्यामुळं आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 326708 वर पोहोचली आहे. सध्याच्या घडीला एकट्या मुंबईत 23448 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
Corona | मुंबईत कोरोना रुग्णांसंख्येत धडकी भरवणारी वाढ
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात तीस हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार काल 30 हजार 535 रुग्ण आढळले आहेत. या वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून मुंबईतील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि मॉलमध्ये आजपासून अँटीजन टेस्ट केली जाणार आहे.
आरोग्य विभागाने म्हटलं की राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 24 लाख 79 हजार 682 झाली आहे. तीन दिवसांपूर्वी कोरोनाचे सर्वाधिक 25,833 दैनंदिन नवीन रुग्ण आढळले होते. तर याआधी सप्टेंबर 2020 मध्ये सर्वाधिक 24,896 नवीन रुग्णांची नोंद झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)