(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Cases Update | राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा चढता आलेख; आज आढळले इतके रुग्ण...
कोरोनाची रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणांवरचा ताण पुन्हा एकदा वाढला आहे.
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा राज्यातील कोरोना परिस्थितीबाबतची महत्त्वाची माहिती जनतेला दिली आहे. ट्विट करत त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशाराच दिला आहे.
दरदिवशी महाराष्ट्रात नव्यानं कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे काही अंशी वाढतानाच दिसत आहे. अर्थात काही दिवस याला अपवादही ठरत आहेत. दरम्यान, रविवारी एका दिवसात राज्यात तब्बल 30535 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, 11314 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली. आतापर्यंत राज्यात एकूण 2214867 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात करण्यात यश मिळवलं आहे.
Nanded Lockdown Again | नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन
'राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.', अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 21, 2021
मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ
तिथं राज्यात कोरोना परिस्थिती चिंतेत टाकत असतानाच मुंबईतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात मुंबईत 3775 नवे कोरोनाबाधित आढळून आहे. ज्यामुळं बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 3,62,654 वर पोहोचला आहे.
पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. ज्यामुळं मृतांचा एकूण आकडा 11582 वर पोहोचला. 10 रुग्णांपैकी 7जण कोमॉर्बिड रुग्ण होते.