एक्स्प्लोर
मुंबईच्या जे. जे. फ्लायओव्हरवर ३ गाड्यांचा विचित्र अपघात

मुंबई: मुंबईच्या जे. जे. फ्लाईओव्हरवर ३ गाड्यांचा काल रात्री मोठा अपघात झाला आहे. हा अपघाता एवढा भीषण होता की, त्यात तीनही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. काल (बुधवार) रात्री ९ वाजता सीएसटीवरून दादरला जात असताना स्विफ्ट डिझायरनं रेनॉल्ट कारला मागून टक्कर दिली. त्यातच मागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीनं या दोन्ही गाड्यांना टक्कर दिली. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्विफ्ट डिझायर कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला नजीकच्या जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.
आणखी वाचा























