एक्स्प्लोर

एबीपी माझामध्ये नवे बदल, काय आहेत हे बदल, का गरजेचा आहे बदल?, 'माझा'ची भूमिका

ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. यामुळं 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलली आहे. एबीपी माझामध्ये नेमके नवे बदल काय झाले आहेत. हा बदल का गरजेचा आहे?, यावर 'माझा'ची भूमिका संपादक राजीव खांडेकर यांनी स्पष्ट केली.

मुंबई : बदल हा आपल्या जीवनातील एक सातत्यपूर्ण घटक आहे. मग तो अमुक एका कालावधीमध्ये झालेला असो किंवा अगदी एकाएकी झालेला असो. हाच बदल आपल्याला अशा एका विश्वात नेतो जे वेगळं आहे, अनपेक्षित आहे आणि तितकंच नवंही आहे. ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत.  यामुळं 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलली आहे. आज सकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या लोगोचं, नव्या रुपाचं अनावरण करण्यात आलं.

यावेळी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, नवीन सुरुवातीपासून आतापर्यंत लोकांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. अमर्याद अशी थीम आहे. आपणही हीच थीम घेऊन काम करत आहोत. आपण आक्रमक झालो मात्र आक्रस्ताळेपणा टाळला. लोकांच्या हक्कांसाठी लढलो. चॅनेल सुरु झाल्यापासून नंबर वन राहिलो. लोकांच्या भल्यासाठी आपल्याला आणखी कसं मजबूतीनं उभा राहता येईल यावर लक्ष देऊ. समाजातील उपेक्षित घटकांना अधिकाधिक ताकत कशी देता येईल यावर लक्ष ठेवू.  नव्या रुपाचं प्रेक्षक नक्की स्वागत करतील. चौकटीच्या पलीकडे जाण्याचा आपला प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

'एबीपी माझाचं दमदार पाऊल, अपेक्षाही तितक्याच', नव्या लोगोच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या भावना

बदलांमागची भूमिका एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, नव्या पिढीसमोर नव्या बदल आणि अपेक्षांसह चॅनल चालवतो. या अपेक्षांसह नवे बदल केले आहेत. आपल्या बदलांची थीम अमर्याद अशी आहे. अमर्याद क्षमता घेऊन आपण काम करतो. आपला हेतू सर्वसामान्य लोकांचं हित सांभाळणं, जपणं हेच आहे. त्यांच्या हक्कांसाठी वकिलीपणानं काम करणं हे आहे. हेच काम आपण गेल्या साडेतेरा वर्षांपासून करत आहोत. हे करत असताना आपण आक्रमक झालो, पण आक्रस्ताळे होणार नाही याची आपण काळजी घेतली. चांगुलपणा आपण कायम ठेवला. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपण पुढं चालत राहिलो, त्याच्याच जोरावर अमाप अशी विश्वासार्हता आपल्याला मिळाली. याच बळावर सुरु झाल्यापासून आपण नंबर वन आहोत, असं ते म्हणाले.

'एबीपी नेटवर्क'चं बदलांचं नवं पाऊल; राज्यपाल कोश्यारी, गडकरी, फडणवीसांसह दिग्गजांकडून शुभेच्छा!

राजीव खांडेकर म्हणाले की, आता आपण असं म्हणतो की लोकांच्या भल्यासाठी अमर्याद स्वरुपात ही ताकत कशी वापरता येईल. समाजात आज ज्या भिंती उभा झालेल्या आहेत. मग त्या खोटेपणाच्या असतील, त्या भेदाभेदाच्या, जातीच्या असतील या सर्व भिंती तोडून आपल्या समाजाला बरोबर घेऊन चांगल्या गोष्टींना आपल्याला ताकत द्यायची आहे. आपला कंटेंट, भूमिका, आपल्या भावना समाजाप्रती जशा होत्या त्या तशाच राहतील. आताच्या काळाला अनुरुप रंगरुप घेऊन आलो आहोत. जेव्हा माझा लॉन्च झाला त्यावेळीही माझाचं रुप सर्वांपेक्षा वेगळं होतं. काळाच्या दोन पाऊल पुढं राहणं हे माझानं स्वत:साठी घालून घेतलेलं एक ब्रीद आहे, असंही खांडेकर म्हणाले,

आज आपण पाहतो की चॅनल्समध्ये बजबजाट आहे. त्यापेक्षा थोडं वेगळं असं हे रुप असेल. नुसत्या टेक्स्टवर बातम्या सांगण्यापेक्षा नव्या रुपात आपल्याला व्हिडीओ, व्हिजुअल्स जास्त असतील. या सर्व बदलांचं प्रेक्षक आनंदानं स्वागत करतील,असंही संपादक राजीव खांडेकर म्हणाले.

नव्या माझातं व्हिजुअली काय बदल दिसणार - लोगो टीव्ही स्क्रिनच्या वर असायचा तो आता खालच्या बाजूला असणार - लोगोची रंगसंगती बदलली - बातमीचं शीर्षक टीव्ही स्क्रिनच्या वर असायचं ते आता खाली दिसणार - स्क्रिनच्या वरच्या बाजूला आगामी कार्यक्रमाची माहिती - वेळ आणि दिनांक खालच्या बाजूला दिसणार

'एबीपी नेटवर्क'चं बदलांचं नवं पाऊल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या लोगोचं अनावरण

एबीपी माझाची भूमिका

अमर्याद राहण्याच्या आमच्या या भूमिकेमुळं दर्शकांप्रती आमची जबाबदारी, दायित्व दाखवून देते. शिवाय वैचारिक दृष्टीकोन विस्तारत आपल्याल कल्पना आणि विश्वासाकडे पाहण्याचा एक मार्ग आम्ही या प्रयत्नांतून देऊ इच्छितो. भारत हा एक असा देश आहे जेथे अमर्याद कौशल्य आणि क्षमता आहे. पण, अंशिक आणि काही मर्यादित माहितीमुळं मात्र भ्रमाच्या भींती उभ्या राहिल्या आहेत. ज्यामुळं बौद्धित बंधनं समोर येऊन खऱ्या कौशल्याला वाव देता येत नाही.

हा बदल अखंड असेल आणि जगाकडे पाहण्याचा एक विस्तीर्ण दृष्टीकोन लाभेल. मोकळ्या मनानं विचार करण्याची एक अतिशय उत्तम आणि तितकाच भीतीदायक बाब म्हणजे तुमच्या बाबतीतील असुरक्षितता. पण, ABP Network नं कायमच धोका पत्करत माध्यम क्षेत्रातील बदलांना समजून घेतलं आहे. सातत्यानं बदलणाऱ्या 'कंझम्पशन मॉडेल'च्या दृष्टीनं आमच्या ब्रँडमध्ये काही उल्लेखनीय सुधारणा करण्यात आल्या आहेत.

ABP Networkची नवी ओळख असणार आहे या ब्रँडचा नवा लोगो. अर्थात एक अशी ओळख ज्या माध्यमातून आमचा दृष्टीकोन, ध्येय्य आणि समाजाला अविरतपणे माहिती पुरवण्याचा आमचा अट्टहास सर्वांपर्यंत अधिक प्रभावी आणि प्रत्यय़कारीपणे पोहोचणार आहे. ज्या माध्यमातून अतिशय तंतोतंत आणि विश्वासार्ह माहिती दर्शकांपर्यंत पोहोचणार आहे. ABP Networkनं कायमच युजर्स फर्स्ट या तत्वावर विश्वास ठेवला आहे. या बदलाच्या निमित्तानं एकंदर अनुभवच बदलेल असं नाही, तर नागरिकांसमवेत नागरिकांसाठीच असणाऱ्या या संस्थेचं नातं आणखी दृढ होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Embed widget