#मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी
नवनिर्वाचित खासदारांना शपथ घेण्याआधी कोणत्या भाषेत शपथ घ्यायची याचा पर्याय दिलेला असतो. त्यामुळे खासदारांना आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याचा पर्यात उपलब्ध आहे.
![#मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी abp majha support to netizens demand, few mps agrees to take oath in marathi Live news update #मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/26125447/TWITTER_WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर नेटीझन्सकडून केली जात आहे. यासाठी #मराठीतशपथ हा हॅशटॅग वापरुन नेटीझन्स अनेक पोस्ट ट्विटरवर शेअर करत आहेत. या मोहिमेला 'एबीपी माझा'ने देखील पाठिंबा दिला.
एबीपी माझाच्या पाठिंब्यानंतर राज्यातील अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचे खासदार सोडले, तर बहुतांश खासदार हे हिंदी किंवा इंग्रजीतून शपथ घेताना दिसतात. त्यामुळे हीच प्रथा मोडित काढण्यासाठी आणि अभिजात दर्जाच्या आग्रहासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.
एबीपी माझाने या मोहिमेत भाग घेत सर्वच्या सर्व खासदारांनी मायबोली मराठीतून शपथ घेण्याचा आग्रह करत आहे. माझाच्या आग्रहानंतर अनेक खासदार मराठीत शपथ घेण्यासाठी पुढे आले आहेत. यामध्ये, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (शिरुर), शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (मावळ), शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (कोल्हापूर), शिवसेनेचे खासदार धैयशील माने (हातकंणगले), शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (बुलडाणा), शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (नाशिक), शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित (पालघर), राष्ट्रवादीच्या खासदार नवनीत कौर राणा (अमरावती), भाजपच्या खासदार भारती पवार (दिंडोरी), माढ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित खासदारांना कोणत्या भाषेत शपथ घ्यायची आहे, याचा पर्याय दिला जातो. खासदारांना आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याचा पर्यात उपलब्ध आहे, त्यामुळे राज्यातील खासदारांनी पद आणि गोपनियतेची शपथ मराठीत घेण्याची नेटीझन्सची मागणी आवास्तव नाही.
मराठी भाषा प्राचीन भारतीय भाषा आहे. तसेच मराठी भारतातील तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेचा जगभरात गौरव केला जातो, मग महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी मराठीत का असू नयेत? महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतच शपथ घ्यावी, असा आग्रह ट्विटर केला जात आहे. मराठी भाषेबाबतच्या आणि खासदारांनी मराठी शपथ घेण्याच्या आशयाचे अनेक ट्वीट ट्विटरवर अनेकांकडून केले जात आहेत. अनेकांनी तर नव्या खासदारांना टॅग करत ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रातून निवडून आलेल खासदार
नंदुरबार - हिना गावित (भाजप) धुळे सुभाष- भामरे (भाजप) जळगाव - उन्मेष पाटील (भाजप) रावेर - रक्षा खडसे (भाजप)) बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना) अकोला - संजय धोत्रे (भाजप) अमरावती - नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी) वर्धा - रामदास तडस (भाजप) रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना) नागपूर - नितीन गडकरी (भाजप) भंडारा -गोंदिया सुनील मेंढे (भाजप) गडचिरोली -चिमूर अशोक नेते (भाजप) चंद्रपूर - बाळू धानोरकर (काँग्रेस) यवतमाळ - वाशिम भावना गवळी (शिवसेना) हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना) नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) परभणी - संजय जाधव (शिवसेना) जालना - रावसाहेब दानवे (भाजप) औरंगाबाद - इम्तियाज जलिल (वंचित बहुजन आघाडी) दिंडोरी - डॉ. भारती पवार (भाजप) नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना) पालघर - राजेंद्र गावित (शिवसेना) भिवंडी - कपिल पाटील (भाजप) कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) ठाणे - राजन विचारे (शिवसेना) मुंबई -उत्तर - गोपाळ शेट्टी (भाजप) मुंबई - उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर (शिवसेना) मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) - मनोज कोटक (भाजप) मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन (भाजप) मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना) दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना) रायगड - सुनिल तटकरे (राष्ट्रवादी) मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना) पुणे - गिरीश बापट (भाजप) बारामती - सुळे (राष्ट्रवादी) शिरुर - अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) अहमदनगर - सुजय विखे (भाजप) शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना) बीड - डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) उस्मानाबाद - निंबाळकर (शिवसेना) लातूर - सुधाकरराव श्रंगारे (भाजप) सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) माढा - रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) सांगली - संजयकाका पाटील (भाजप) सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत (शिवसेना) कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना) हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)