Watch Video: समुद्रात बुडणाऱ्या महिला पर्यटकाला मुंबई पोलिसांनी वाचवलं, गेट वे ऑफ इंडियाजवळील घटना कॅमेऱ्यात कैद
Watch Video: या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
Watch Video: मुंबईतील (Mumbai) गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे समुद्रात बुडणाऱ्या महिला पर्यटकाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाचवलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. काही दिवसांपूर्वी एका दिव्यांग व्यक्तीला मुंबई वाहतूक पोलीस रस्ता ओलांडण्यास मदत करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेनं प्रवास करीत होती. दरम्यान, बोटीतून प्रवास करताना लाटेच्या धडकेमुळं बोटीला मोठा धक्का बसला. ज्यानंतर महिला समुद्रात पडली. सुदैवानं या महिलेनं लाईफ जॅकेट घातलं होतं. यामुळं ही महिला बराच वेळ पाण्यात तरंगत होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्ठळी धाव घेऊन या महिलेचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एएनआयचं ट्वीट-
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात दररोज हजारो पर्यटक येत असतात. गेट वे ऑफ इंडिया येथून अनेक पर्यटक बोटीनं एलिफंटा आणि मांडवाला प्रवास करतात. रविवारच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
मुंबई वाहतूक पोलिसाचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत वाहतूक पोलीस राजेंद्र सोनावणे यांनी एका व्यक्तीला वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या रस्ता पार करून देण्यात मदत केली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-