एक्स्प्लोर
CAA : मुंबईत सीएएविरोधात रॅली तर दुसरीकडे सीएएच्या समर्थनात सभा
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात पोलिसांनी रॅली नाकारल्यानंतर भाजपनं सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई पोलिसांनी भाजपच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत असताना मुंबईमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या बाजूने तर दुसरीकडे नागरिकत्व कायद्याच्याविरोधात रॅली काढण्यात आली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. बहूजन वंचित आघाडी, जेएनयू, एएमयू, आयआयटी बॉम्बे, टीस्स या संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपची मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात सभा घेण्यात आली. या सभेत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेते उपस्थित होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात पोलिसांनी रॅली नाकारल्यानंतर भाजपनं सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई पोलिसांनी भाजपच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. फक्त ऑगस्ट क्रांती मैदानावर भाजपला सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. भाजप नेत्यांची या ठिकाणी फक्त सभा होणार आहे. याच ठिकाणी ते नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा देणार असल्याचे सांगितले जात आहे.
CAA | ऑगस्ट क्रांती मैदानात भाजपकडून समर्थनात सभा | ABP Majha
नागरिकत्व कायद्या विरोधात जॉईनट अँक्शन कमिटीच्यावतीने दुपारी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये बहूजन वंचित आघाडी, जेएनयू, एएमयू, आयआयटी बॉम्बे, टीस्स या संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
संबंधित बातम्या :
CAA : दिल्लीतल्या हिंसाचारामागे काँग्रेसची तुकडे-तुकडे गँग; अमित शाहांचा आरोप
देशावर तुकडे तुकडे गँगची सत्ता; तुषार गांधींचा मोदी-शाहांना टोला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement