CAA : दिल्लीतल्या हिंसाचारामागे काँग्रेसची तुकडे-तुकडे गँग; अमित शाहांचा आरोप
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी लोकांची दिशाभूल केली आहे. लोकांची माथी भडकवली आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग दिल्लीतली शांतता भंग करत आहे.
![CAA : दिल्लीतल्या हिंसाचारामागे काँग्रेसची तुकडे-तुकडे गँग; अमित शाहांचा आरोप Amit Shah Says Congress is Behing violent Protest in Delhi CAA : दिल्लीतल्या हिंसाचारामागे काँग्रेसची तुकडे-तुकडे गँग; अमित शाहांचा आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/27085151/Amit-Shah-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि आगामी दिल्ली विधानसभा निडणुकीमुळे दिल्लीतलं राजकारण तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिल्लीतल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच शाह यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर हल्ला चढवला आहे.
अमित शाह म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत जी आंदोलनं सुरु आहेत, त्यामागे काँग्रेस आहे. काँग्रसनेच लोकांची दिशाभूल केली आहे. लोकांची माथी भडकवून त्यांना आंदोलनं करण्यास प्रवृत्त केलं आहे. याचदरम्यान अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. शाह म्हणाले की, केजरीवाल सरकार केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेत आहे.
अमित शाह म्हणाले की, काँग्रेस पक्ष खूप वर्ष सत्तेत होता. ते पाच वर्षांच्या कार्यकाळात एखादी योजना बनवायचे. पुढील पाच वर्षात त्यासाठीचा निधी मंजूर केला जात होता. तिसऱ्या पाच वर्षात त्या योजना/विकासकामाचं भूमीपूजन केलं जात होतं. त्यापुढील पाच वर्षात तेच काँग्रेस सरकार ती योजना विसरून जात होतं. त्यांनी कधी कामं केली नाहीत, मात्र आता आम्ही कामं करतोय, तर काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे.
शाह म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी लोकांची दिशाभूल केली आहे. लोकांची माथी भडकवली आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग दिल्लीतली शांतता भंग करत आहे. दिल्लीच्या जनतेने या तुकडे-तुकडे गँग आणि काँग्रेसला धडा शिकवायला हवा. दिल्लीच्या जनतेने आगामी विधानसभा निवडणुकीत हे काम करायला हवे.
शाह म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आम्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला होता. दोन्ही सभागृहात त्याविषयी चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेस यावर काहीच बोलली नाही. आता मात्र हीच काँग्रेस या कायद्याविरोधाल लोकांना भडकावून हिंसाचार करायला लावत आहे.
पाहा काय म्हणाले अमित शाह?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)