एक्स्प्लोर

बीएमसीची वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदेशीर असल्याचा आरोप, हायकोर्टात याचिका दाखल

मुंबईतील बेकायदेशीर वृक्षतोड आणि वृक्षछाटणी विरोधात आवाज उठवणाऱ्या झोरू भटेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची वृक्षप्राधिकरण समिती ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. कायद्यानुसार या समितीची संख्या ही 15 पेक्षा जास्त नसावी. तसेच यात 7 नगरसेवक आणि 7 या संदर्भातील जाणकार व्यक्तींचा समावेश असावा. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकारण समितीत 13 नगरसेवकांचा समावेश आहे.

या 13 नगरसेवकांना झाडांच्याबाबतीत कोणतंही शास्त्रीय ज्ञान नाही, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी यावर उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतचा अवधी मागून घेतला आहे. मुंबईतील बेकायदेशीर वृक्षतोड आणि वृक्षछाटणी विरोधात आवाज उठवणाऱ्या झोरू भटेना यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. यावर बुधवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मुंबईत वृक्षतोडीसाठी परवानगी देण्याचे अधिकार हे केवळ वृक्ष प्राधिकरणालाच आहेत, पालिका आयुक्तांना नाही. वृक्षतोड किंवा फांद्या छाटण्यासाठी नेमून दिलेल्या प्रक्रियेचं पालन करणंही बंधनकारक असल्याचंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर कोणतंही झाड तोडण्यासाठी दरवेळेस परवानगी घेणं बंधनकारक असून, एकदा दिलेली परवानगी सरसकट वृक्षतोडीसाठी वापरता येणार नाही, असं हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. झाडांच्या फांद्या छाटण्यासाठीही उद्यान विभागाची परवानगी आवश्यक असेल. फांद्या छाटण्यासाठी सामान्य परिस्थितीत 15 दिवस आधी उद्यान विभागाला कळवणं आवश्यक असेल. तर आपत्कालीन परिस्थितीत उद्यान विभागाला दोन दिवसांत परवानगी देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

वृक्ष छाटणीच्या नावाखाली मुंबईतील झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात असून पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती याकडे दुर्लक्ष करत आहे. एखाद्या झाडाच्या फांद्या तोडायच्या असतील तर त्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ते शास्त्रीय पद्धतीनं न ठरवल्याबद्दल हायकोर्टानं याआधीच्या सुनावणीत संताप व्यक्त केला होता.

तसेच एखाद्या झाडाची फांदी तोडायची असल्यास ती फांदी मृत झाली आहे का?, ती फांदी खरोखरच धोकादायक होऊ शकते का?, हे ठरवण्यासाठी वनस्पतीशास्रातील जाणकारांची मदत का घेतली जात नाही? असा सवालही हायकोर्टाने विचारला होता. एखाद्या झाडाच्या अनेक फांद्या छाटल्या ते तर झाड पूर्णपणे तोडलं गेल्यासारखंच आहे असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget