एक्स्प्लोर

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! ताडदेवच्या भाटिया रुग्णालयाशेजारील इमारतीला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू

ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुंबई : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत  20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत 22 जण जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. 

आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. पावणे आठच्या सुमारास ही आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. 

मितेश मीस्त्री, मंजूबेन कंठारिया, पुरूषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघांचा मृत्यू झाला तर हंसा चोक्सी, फालगुणी चोक्सी, धावेल, यश चोक्सी, शुभांगी साळकर, दिलीप साळकर, ममता साळकर, तनिषा सावंत, अंकिता चौधरी, धनपत पंडित, गोपाळ चोपडेकर, स्नेहा चोपडेकर, वेदांगी चोपडेकर, मीना चव्हान, प्रतिमा नाईक, कल्पना नाडकर्णी, स्मीता  नाडकर्णी, रुदया चोपडेकर, मनिश सिंग, मंजू खान्ना अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

सकाळी सातच्या दरम्यान आग लागली. आग लागल्यानंतर पूर्ण लाईट इमारतीची गेली. बाहेर पाहिलं तर मोठ्या धूर पाहायला मिळत होता आणि आग लागल्याची माहिती मिळताच सगळेजण इमारतीच्या खाली आले. प्रत्येक मजल्यावर सहा घर आहेत. या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे 20 ते 22 रहिवासी राहात असतील. आता सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे, सध्या जखमींपैकी 16जणांवर उपचार सुरू आहेत तर किरकोळ जखमी जालेल्या 7 जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं असल्याचे तिथल्या रहिवाशांनी सांगितलं. 

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! ताडदेवच्या भाटिया रुग्णालयाशेजारील इमारतीला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू

इमारतीत काही लोक अडकल्याची भीती
आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली  याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीतून आतापर्यंत दोघांना बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

"आग लागलेली इमारत पूर्णपणे खाली करण्यात आलेली आहे. या आगीमध्ये दहा जण जखमी असून त्यातील काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत मधील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरुवातीला करण्यात आलं आहे. इमारतीमधील सर्वांना बाहेर काढण्यात आलं असलं तरी या आगीमध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget