![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके निलंबित; ट्राफिक विभागातील घोटाळ्याचा केला होता पर्दाफाश
सुनील टोके मुंबई पोलिसांच्या ट्राफिक विभागात हेड कॉन्स्टेबल पदावर असताना त्यांनी एक जनहित याचिका सादर केली होती. परंतु, आता त्यांनाच पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.
![Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके निलंबित; ट्राफिक विभागातील घोटाळ्याचा केला होता पर्दाफाश Assistant Sub Inspector of Police Sunil Toke suspendedmumbai who petition against corruption of traffic police department Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके निलंबित; ट्राफिक विभागातील घोटाळ्याचा केला होता पर्दाफाश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/22/3e6977cd76b66674ac71ec7d41e408a2_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध सतत माध्यमांशी बोलत असल्याचे कारण देत टोके यांना निलंबित करण्यात आले.
मुंबई पोलीस दलातील ट्राफिक विभागात होत आलेल्या घोटाळ्याचा सुनील टोके यांनी पर्दाफाश केला होता. टोईंग चार्जेसच्या नावाखाली वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून बेकायदेशीररीत्या पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप करत टोके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
दरम्यान, निलंबन करण्यात आल्यानंतर टोके म्हणाले "हे निलंबन बेकायदेशीर असून यापूर्वी 2018 मध्ये मला निलंबनाचा सामना करावा लागला आहे. परंतु, या निलंबनाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहे. मी भ्रष्टाचाराचे स्टिंग ऑपरेशन करून ट्राफिक विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे."
कोण आहेत सुनील टोके?
सुनील टोके मुंबई पोलिसांच्या ट्राफिक विभागात हेड कॉन्स्टेबल पदावर असताना त्यांनी एक जनहित याचिका सादर केली होती. ज्यात त्यांनी ट्राफिक विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात दाद मागितली होती. यासंदर्भात वारंवार वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करूनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे अखेरीस त्यांनी हायकोर्टाचं दार ठोठावलं होतं. आपल्या याचिकेतून त्यांनी ट्राफिक विभागाच्या भ्रष्टाराचं रेटकार्डचं कोर्टासमोर सादर केलं होतं. ज्याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फैलावर सखोल चौकशीचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Police : ट्राफिक पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरोधात एका पोलिसाचीच हायकोर्टत जनहित याचिका
- दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट
- सार्वजनिक सुट्टी मागणं हा नागरीकांचा कायदेशीर अधिकार नाही : हायकोर्ट
- Raj thackeray : राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)