एक्स्प्लोर
61% लोकांना झोपेतून उठताच मोबाइल हाती हवा: सर्व्हे
मुंबई: झोपेतून उठल्या-उठल्या सर्वात आधी आपण आपला मोबाइल कुठे हे ते शोधतो आणि लागलीच मोबाइलमधील अपडेट पाहणं सुरु करतो. अशी सवय फक्त तुम्हालाच नाही तर अनेकांना आहे. जवळजवळ 61 टक्के लोकांना झोपेतून उठल्या-उठल्या मोबाइल हातात लागतो. नुकताच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे.
काय आहे सर्व्हेची माहिती:
सर्व्हेच्या मते, स्मार्टफोनचा उपयोग करणारे सर्वात जास्त लोकं हे झोपतून उठताच सर्वात आधी आपला फोन हातात घेऊन त्यावरील अपडेट पाहतात. झोपतून उठण्याआधी मोबाइल पाहणं आणि झोपण्यापूर्वी मोबाइल पाहणं हे त्यांचं शेवटचं काम असतं.
96 टक्के लोक झोपेतून उठताच मोबाइल चेक करतात:
डेलॉइट ग्लोबल मोबाइल कंझ्युमर सर्व्हे - 2016 नुसार, सर्व्हेत सहभागी झालेल्या 61 टक्के लोकांना अशी सवय आहे. उठल्यानंतर 5 मिनिटाच्या आत त्यांना मोबाइल हातात हवा असतो. तर उठल्यानंतर 30 मिनिटात फोन हातात घेणारे 88 टक्के लोकं आहेत. तर हा वेळ तासाचा केल्यास याची संख्या तब्बल 96 टक्के होते.
झोपण्यापूर्वी 15 मिनिट आधीपर्यंत मोबाइल चेक करतात:
सर्व्हेनुसार, झोपण्यापूर्वी फोन चेक करणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे. तब्बल 74 टक्के लोकं हे अगदी झोपेपर्यंत आपला मोबाइल हाताळत असतात.
स्मार्टफोनचा वापर वाढला आहे:
सर्व्हेचे प्रमुख नीरज जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व्हेतून एक गोष्ट समोर आली की, स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाइलचा कसा उपयोग केला जातो हे या सर्व्हेत समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement