पोलीस स्थानकांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी दिलेल्या 60 कोटींची उधळपट्टी : मुंबई उच्च न्यायालय
1089 पैकी केवळ 547 पोलीस स्थानकांत 6092 कॅमेरे बसवले असून त्यातील 400 कॅमेरे बंदच असून राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याबाबत कबूली दिली आहे.
राज्यात 1 हजार 89 पोलीस स्थानकांपैकी केवळ 547 पोलीस ठाण्यांमध्ये 6 हजार 92 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आणि यापैकी 5 हजार 639 सीसीटिव्ही कॅमेरे कार्यरत असल्याचं पोलीस प्रशासनानं कबूल केलं. यासंदर्भात नियोजन आणि समन्वय समितीचा अहवाल एडीजीपीनं सादर न केल्याबद्दलही हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही हायकोर्टानं निर्देश दिल्यानंतरच या सीसीटीव्हीबाबतच्या कामांचा वेग आला होता. आता प्रत्येकवेळी आम्ही निर्देश देण्याची वाट पाहताय का? असा सवाल करत आमचेच निर्देश अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी परिपत्रकातून नव्यानं मांडल्याबाबत प्रशासनाला खडेबोलही सुनावले. न्यायालयाच्या निर्देशांनतरच नियोजन आणि समन्वय विभाग काम करतं हे आमच्या आता निदर्शनास आल्याचंही यावेळी न्यायालयानं नमूद केलं.
- पोलीस महासंचालक संजय पांडेबाबतचा फैसला 21 फेब्रुवारीला - मुंबई उच्च न्यायालय
- Maharashtra Bandh Over Lakhimpur : माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांच्या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याची शेवटची संधी, उच्च न्यायालयाचे निर्देश
- न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांची यापुढे खैर नाही! मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha