एक्स्प्लोर
मुंबई विमानतळावर 36 कोटींचं कोकेन जप्त

मुंबई : मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधी पथकानं तब्बल 6 किलोचं कोकेन जप्त केलं आहे. या कोकेनची किंमत जवळपास 36 कोटी रुपये आहे. फ्रेडी अन्ड्रेस असं या कोकेन तस्कराचं नाव आहे. आज मुंबई विमानतळावर लॅपटॉपमधून कोकेनची तस्करी होणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या तस्कराला ताब्यात घेण्यात आलं. लॅपटॉपच्या आतमध्ये कोकेन लपवून त्याची तस्करी केली जात होती. यात तपासणी केली असता 12 पॅकेट्स कोकेन सापडलं आहे. दरम्यान फ्रेडी अन्ड्रेसला अटक करण्यात आली आहे. तसंच 36 कोटींचं कोकेनही जप्त करण्यात आलं आहे. हे कोकेन नेमकं कुणाला देण्यात येणार होतं याचा पोलिस तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























