एक्स्प्लोर
एकट्या मुंबईत चार चाकी वाहनांची संख्या तब्बल 10 लाख!
मुंबई : मायानगरी मुंबई ही वेगासाठी ओळखली जाते. पण याच महानगराचा वेग आता कमालीचा मंदावला आहे. त्याला कारण ठरलं आहे मुंबईत वाढलेल्या चार चाकी वाहनांची संख्या. मुंबईत चार चाकी वाहनांची संख्या तब्बल 10 लाखांवर गेल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मुंबईत जानेवारी 2016 पर्यंत 9 लाख 39 हजार चार चाकी वाहनं होती. पण गेल्या एका वर्षात या वाहनांची संख्या 9.3 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच मुंबईत आता 10 लाख 27 हजारा चार चाकी वाहनं धावत आहेत. याआधी शहरात 9 लाख 39 हजार चारचाकी वाहनं होती.
इतकंच नाही, तर राज्यभरातल्या सर्वप्रकारच्या एकूण 2 कोटी 90 लाख वाहनांपैकी 10 टक्के म्हणजे 29 लाख वाहनं ही एकट्या मुंबईत असल्याचंही समोर आलं आहे.
एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली, तरी ती वाहून नेण्यासाठी रस्त्यांची लांबी मात्र वाढत नाही. मुंबईत आजही फक्त दोन हजार किलोमीटर लांबीचेच रस्ते आहेत. ज्यामुळे वाहनांच्या बाबतीत मुंबई हे राज्यातलंच नाही, तर देशातलं सर्वाधिक घनतेचं शहर बनलं आहे.
मुंबईत प्रति शंभर मीटर 141 वाहनं उभी राहू शकतात. तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त 36 पर्यंत मर्यादित आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात 33 वाहनं आणि पुण्यात 26 वाहनं उभी राहतात.
संपूर्ण राज्यात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या ही 2 कोटी 90 लाख इतकी आहे आणि त्यातली 10 टक्के म्हणजेच 29 लाख वाहनं ही एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे वाहनं चालवणं राहिलं दूर, आता पार्किंगसाठीही जागा उरलेली नाही.
मुंबईत लोकलवरचा रोज वाढत जाणारा भार मोठा आहे. शिवाय खोळंबलेले मेट्रो प्रकल्प, फसलेली मोनो यामुळे मुंबईचा वेग कमालीचा मंदावला आहे. त्यात पुराणकाळात बांधलेले फ्लायओव्हर लवकरच कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास मुंबईत या वाहनांना चालवण्यासाठी जागाच उरणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement