एक्स्प्लोर
मुंबई महापालिका निवडणुकीत घमासान, एका वॉर्डात 37 उमेदवार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक वॉर्डमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष स्वबळावर लढत असल्याने अनेक ठिकाणी चौरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. काही ठिकाणी एमआयएम, मनसे, सपा किंवा अपक्ष उमेदवाराचं कडवं आव्हान असेल. त्यामुळे उमेदवारांची संख्या 10 ते 15 च्या वर जाण्याची शक्यता कमी. मात्र एका वॉर्डात तब्बल 37 उमेदवार रिंगणात उतरत आहेत.
37 ही मुंबईत एका वॉर्डातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या आहे. या बहुपर्यायामुळे उमेदवारांबरोबर जनताही हैराण झाली आहे. ही लढाई मुंबईतल्या वॉर्ड नंबर 164 मध्ये रंगणार आहे.
या वॉर्डमध्ये मराठी, मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय तसंच मद्रासी भाषिक मिळून मतदारसंख्या तब्बल 46 हजार आहे. नवीन रचनेनुसार हा पाच वॉर्डांचा मिळून एक वॉर्ड झाला आहे. म्हणजे पाच नगरसेवकांच्या थोड्या-थोड्या भागांचा मिळून एक वॉर्ड तयार झाला आहे.
सुंदर बाग, काजूपाडा, कमानी, कोहिनूर वायरगल्ली, अशोक नगर, गुरुगोविंद सिंग आणि विद्याविहारचा थोडा भाग यामध्ये आहे. याचा फटका गेल्या साडेचार वर्षांपासून समाजवादी पार्टीच्या नगरसेवक इसहाक शेख आणि सहा महिन्यांपूर्वी नगरसेवक झालेल्या भाजपच्या हरिष भादींगे यांना बसण्याची शक्यता आहे.
इसहाक शेख हे समाजवादी पार्टीचे निवडून आलेले नगरसेवक होते, पण खोटी जातप्रमाण पत्र सादर केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचं नगरसेवकपद सहा महिन्यांपूर्वी रद्द करुन भाजपच्या हरिष भादींगे यांना देण्यात आलं.
उमेदवारांपुढे आव्हानं मोठी असली तर खरं आव्हान हे मतदारराजापुढे आहे. 37 उमेदवार 37 प्रकारची वेगवेगळी आश्वसनं घेऊन येणार म्हटल्यावर मतदारराजा कन्फ्युज होणारच. पण या 37 जणांच्या यादीत जनता कौल कोणाला देणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement