एक्स्प्लोर

Western Railway : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर 2700 लोकल आणि 45 एक्सप्रेस राहणार रद्द, आजपासून सुरु होणार ब्लॉकची मालिका

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 26 ऑक्टोबर पासून ते  पाच नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये जवळपास 2700 पेक्षा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई : जर तुम्ही पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवास करणारे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी पाच नोव्हेंबर पर्यंत डोकेदुखी वाढवणारी ही बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे वरील तब्बल 2700 पेक्षा जास्त लोकल (Local) 26 ऑक्टोबर पासून ते  पाच नोव्हेंबरच्या काळात रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील खार आणि गोरेगाव दरम्यान दरम्यान 8.8 किमीची सहावी मार्गिका सुरु करण्यासाठी मुख्य जोडकाम 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तसेच 5 नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरु राहील. यामुळे दररोज 300 पेक्षा जास्त अधिक सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. 

तसेच 300 पेक्षा जास्त लोकल या विलंबाने धावतील. यामुळे पुढील आठवडा रेल्वे प्रवाशांची परीक्षा पाहणारा असणार असल्याचं सांगण्यात येतय.  पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार/डहाणू रोडदरम्यान दररोज 1383 लोकल फेऱ्या धावतात. या लोकलमधून दररोज 20 ते 30 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र लोकल आणि मेल एक्सप्रेस साठी वेगवेगळ्या मार्गिका करण्याच्या प्रकल्पांतर्गत काम करण्यात येणार आहे. सहाव्या मार्गिकेचे हे काम असणार आहे. 26 - 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. यामुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्या रद्द होणार आहेत. 

'या' तारखेला असणार जम्बो मेगाब्लॉक

 चार आणि पाच तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडून 24 तासांचा एक जम्बो मेगाब्लॉक देखील घेण्यात येईल. त्यामुळे पाच तारखेपर्यंत पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून माहिती देण्यात आलीये. 

 वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द

27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान रोज नऊ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. यामुळे वातानुकूलित लोकल प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. 1 नोव्हेंबरपासून वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच   एसी लोकलच्या तिकीट-पासवर साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीतून प्रवास करण्याची मुभा प्रवाश्यांना देण्यात आलीये. 

पश्चिम रेल्वेवरील रद्द होणाऱ्या लोकल

दिनांक  वार   अप डाऊन  एकूण रद्द एकूण विलंबने 
27-10-2023 शुक्रवार 129 127 256 250
28-10-2023 शनिवार 129 127 256 250
29-10-2023 रविवार 116 114 230 200
30-10-2023 सोमवार 158 158 316 200
31-10-2023 मंगळवार 158 158 316 200
01-11-2023 बुधवार 158 158 316 00
02-11-2023 गुरुवार 158 158 316 50
03-11-2023 शुक्रवार 158 158 316 50
04-11-2023 शनिवार 46 47 93 50
05-11-2023 रविवार 54 46 110 50

त्यामुळे या कालावधीमध्ये रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रवाश्यांच्या गैरसोयीसाठी रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलीये. दरम्यान मेल एक्सप्रेस प्रमाणे लोकल सेवांवर देखील या ब्लॉकचा परिणाम होणार असल्यामुळे चाकमान्यांना देखील मोठ्या त्रासाला समोरे जावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : 

Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पुलाची एक बाजू फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार, महापालिका आणि पश्चिम रेल्वेच्या बैठकीत निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Embed widget