एक्स्प्लोर
हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या 20 ट्रेकर्सची अखेर सुटका
काल रात्रीपासून कल्याणमधील 20 ट्रेकर्स मुरबाडजवळच्या हरिश्चंद्रगडावर अडकले होते. या ट्रेकर्सची अखेर सुटका करण्यात आली आहे.
कल्याण : काल रात्रीपासून कल्याणमधील 20 ट्रेकर्स मुरबाडजवळच्या हरिश्चंद्रगडावर अडकले होते. या ट्रेकर्सची अखेर सुटका करण्यात आली आहे. या पर्यटकांनी किल्ला उतरायला सुरुवात केली आहे. हे ट्रेकर्स सध्या कोकणकड्याचा 500 मीटरचा सुळका उतरत आहेत. अद्याप 300 मीटरचा एक सुळका त्यांना उतरावा लागणार आहे. त्यानंतर पुढच्या सात ते आठ तासांत हे ट्रेकर्स त्यांच्या बेसकॅम्पला पोहोचतील.
कल्याण येथील डॉ. हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते तेथून पुढे दीड किलोमीटरवर असणाऱ्या कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व ट्रेकर्स अडकले होते. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदारांना पोलिसांची मदत घेऊन तसेच अडवाणी यांच्याशी समन्वय साधून ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले होते.
अंधार पडल्यानंतर काल रात्री ट्रेकर्सचे हे पथक वाट चुकले होते. परंतु पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि एडीआरएपच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनतर शोधण्यात यश मिळाले आहे.
हे वाचा : हरिश्चंद्रगडावर 20 ट्रेकर्स अडकले, सुटका करण्याचे प्रयत्न सुरू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement