एक्स्प्लोर
टीव्ही रिमोटच्या भांडणातून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
भिवंडीत टीव्हीच्या रिमोटवरुन भावासोबत वाद झाल्यामुळे बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भिवंडी : भिवंडीत टीव्हीच्या रिमोटवरुन भावासोबत वाद झाल्यामुळे बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील कांबे भोईरपाड्यात ही घटना घडली. क्रिकेटची मॅच बघत बसलेल्या आकाशला त्याची बहिण सोनाली भोईर हिने रिमोट मागतिला. पण रिमोट देण्यास आकाशने नकार दिला. त्यावरुन दोघांमध्येही क्षुल्लक भांडण झालं. या रागातूनच 19 वर्षाच्या सोनालीने घरातील लाकडी छताला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येच्या घटनेची नोंद केली आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहे.
आणखी वाचा























