एक्स्प्लोर

अंबरनाथ नगरपालिकेमुळे 180 कुटुंब ऐन पावसाळ्यात बेघर?

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झोपडपट्टी तोडून ती जागा बिल्डरच्या घशात घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. त्यामुळे 180 कुटुंब बेघर झाली आहेत.

कल्याण : रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झोपडपट्टी तोडून ती जागा बिल्डरच्या घशात घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे या झोपडीधारकांना अंबरनाथ नगरपालिकेनं पर्यायी व्यवस्थेच्या नावाखाली ज्या जागेत वसवलं, ती जागा खासगी मालकीची निघाल्यानं न्यायालयानं ती जागाही रिकामी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे फसवणूक झाल्याची भावना झोपडीधारकांच्या मनात आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा मिळाला. त्यामुळे 40 फुटांचा रस्ता 100 फूट रुंद करण्याचं काम हाती घेण्यात आलं. त्यावेळी उल्हासनगर आणि अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या रस्त्यालगतच्या 180 झोपड्या अंबरनाथ नगरपालिकेनं जमीनदोस्त केल्या. झोपड्या तोडताना रहिवाशांना अंबरनाथच्या विमको कंपनीजवळ असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर वसवण्यात आलं. नागरिकांना स्थलांतरित केलेली जागाही खासगी असल्यानं जमिनीचा मालक न्यायालयात गेला. न्यायालयाने तातडीने अंबरनाथ पालिकेनं केलेल अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर आता 180 झोपड्यांमध्ये राहणाऱ्या जवळपास 500 रहिवाशांनी जायचं कुठे? असा प्रश्न पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झोपड्या तोडून जी जागा रिकामी करण्यात आली होती. तिला आता पत्रे मारण्यात आलेत. याच जागेच्या मागे एका मोठ्या बिल्डरचं बांधकाम सुरु असून त्यानेच हे पत्रे मारत जागा हडपल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. नागरिकांना स्थलांतर करताना तुम्हाला हक्काची जागा देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. यामध्ये अंबरनाथ नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी गणेश देशमुख, तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन नगरसेवक याकूब सय्यद यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना या खासगी जागेत वसवलं होतं. मात्र ही जागा खासगी असल्याचं पालिकेला आणि अधिकाऱ्यांना माहित नव्हतं का? आणि माहित असेल तर आमची फसवणूक का केली? असा नागरिकांचा सवाल आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आणि नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी या रहिवाशांनी केली आहे. तर तत्कालीन नगरसेवक याकूब सय्यद यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget