एक्स्प्लोर
Advertisement

लालबाग-परळमध्ये 135 गणेशभक्तांचे मोबाईल लंपास
'लालबागचा राजा' परिसरात गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल 135 मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र 'लालबागचा राजा' परिसरात संधीसाधू चोरट्यांनी भक्तांचे खिसे कापणंही सोडलं नाही. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल 135 मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.
मुंबईतील लालबाग परिसरात 'लालबागचा राजा'चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागते. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हेतू साध्य करताना दिसत आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्यात चार दिवसात तब्बल 135 मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.
गणेशोत्सव काळात मुंबईतील विविध भागातून गणपती पाहण्यासाठी लालबाग, परळ परिसरात हजारो भक्त गर्दी करत असतात. सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले असले तरीही भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तू चोरत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांचा आढावा घेता सुरत गॅंग आणि यूपी गॅंग या टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
धाराशिव
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
