एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये पहिल्याच दिवशी पाचशेच्या तब्बल 1200 बनावट नोटा
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्याच दिवशी बँक आणि पोस्टामध्ये तब्बल 356 कोटी 40 लाख जमा झाले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी 500 रुपयांच्या तब्बल 1200 बनावट नोटा आढळून आल्या आहेत.
500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर त्या नोटा बदलून घेण्यासाठी औरंगाबादमध्ये बँकेत भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. पण यावेळी 500 रुपयांच्या तब्बल 1200 नकली नोटा आढळून आल्या. नकली नोटा आढळून आल्यानं अनेक सामान्य नागरिकांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ज्यांच्याकडे 8 पेक्षा जास्त बनावट नोटा आढळतील त्यांची माहिती थेट पोलिसांना देण्यात येईल अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे. जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. त्यांच्याकडे एक दोन बनावट नोटा आढळल्या तर कारवाई केली जाणार नाही. मात्र आठ किंवा त्यापेक्षा जास्त नोटा आढळल्या तर कारवाई होऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement