एक्स्प्लोर
परीक्षेत कॉपी करताना पकडलं, घरी येऊन 12 वर्षीय मुलीची आत्महत्या
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पवईत राहणाऱ्या रिद्धीने कुर्ल्यातील सेंट मायकल या शाळेत परीक्षा दिली होती.
मुंबई : परीक्षेत कॉपी करताना पकडल्याच्या कारणामुळे 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पवईत राहणाऱ्या रिद्धीने कुर्ल्यातील सेंट मायकल या शाळेत परीक्षा दिली होती.
रिद्धी आठवीत शिकत होती. परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकांनी हा प्रकार रिद्धीच्या पालकांना कळवला आणि घरी जाण्यास सांगितलं. रिद्धीच्या आई स्वतः मुलांचे ट्यूशन घेतात. घरी आल्यानंतर रिद्धी तिच्या खोलीत गेली. रिद्धी खोलीतून बाहेर येत नसल्याचं पाहून आईने खोलीत प्रवेश केला. तेव्हा रिद्धी घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.
या घटनेनंतर रिद्धीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलीस आता या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत. शिक्षकांनी रिद्धीला सर्व मुलांच्या समोर अपमानित केलं होतं का, याचीही चौकशी होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement