एक्स्प्लोर

लालबागचा राजा परिसरात अग्निशमन बंबास दिवसाला सव्वा लाख भाडे, बैठकीत मुद्दा; मुख्यमंत्र्यांकडून कमी करण्याचं आश्वासन

मुख्यमंत्र्‍यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनीही झालेल्या चर्चेची माहिती दिली.

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक गणेश मंडळे कामाला लागली आहेत. यंदाही दणक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळे आणि भाविक उत्साही दिसून येत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मुंबईतील (Mumbai) सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे, त्याचा एक आराखडा तयार केला असून तो लवकरच जाहीर होईल. गणेशोत्सव उत्साहात साजरा करा, गणेशोत्सवावर काही संकटं आली होती, ती विघ्नहर्त्यानेच दूर सारली. तर, अग्निशमन दलाचे बंब वापरण्यासाठी लालबागचा राजा (lalbaugcha raja) गणेश मंडळांकडून दिवसाला सव्वा लाख रुपये आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावरही मुख्यमंत्र्‍यांनी भूमिका मांडली.

गणेशोत्सव काळात पोलिस विभागाने योग्य समन्वय राखावा, पुण्यात विसर्जन मिरवणुकांचे नीट नियोजन करावे. तसेच, 'ऑपरेशन सिंदुर' आणि विकसित राष्ट्राचा प्रवास सुरू असताना जे अडथळे येत आहेत, ते पाहता 'स्वदेशी' या दोन विषयांवर जनजागरण कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्‍यांनी गणेश मंडळांना केले आहे. मुख्यमंत्र्‍यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनीही झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यामध्ये, मुंबईतील लालबागचा राजाच्या मंडपाबाहेरील दिवसाला सव्वा लाख रुपये भराव्या लागणाऱ्या 'त्या' सुविधेचे भाडे कमी होणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच, गणेश मंडळांवर कृपादृष्टी दाखवली असून मंडपासाठीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे पैसे माफ होणार आहेत, असेही यांनी सांगितले. 
 D
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, समन्वय समितीसोबत ही बैठक झाली. काही प्रश्न मार्गी लागले होते, मात्र आज काही पेडिंग होते, आगामी आगमनाची मिरवणूक होणार आहे, त्यासाठी गर्दी होते त्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिससंदर्भात निर्णय मर्यादित ठेवला आहे, अशात कायमस्वरूपी दिलासा त्यात द्यावा अशी मागणी आपण केली आहे. गणेशोत्सवासंदर्भातील एसओपीत दुरुस्ती केल्यास ते होऊ शकते, याबाबत काकोडकर यांचा अहवाल लवकरात लवकर येऊ द्या. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, त्यानुसार परवानगी मिळावी अशी मागणी केल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.  

लालबागचा राजा येथील अग्निशमन बंबांना सवलत

मुंबईतील अनेक गणेश मंडळांजवळ अग्निशमन दलाचे बंब असतात ते लालबागचा राजा इथेही उभे असतात. मात्र, या सेवेसाठी महापालिकेकडून सव्वा लाख रुपये दिवसाला (24 तासासाठी) चार्ज केले जातात. मात्र, लालबागचा राजाचा इथे उभे असलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या रकमेत सूट द्यावी, अशी मागणी मंडळाने केली होती. त्यास, मुख्यमंत्र्‍यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच, गणेश मंडळाच्या खड्ड्यांबाबत 15 हजार रुपये प्रति खड्डा घेणार होते, तो आता 2 हजार रुपये करण्यात आला आहे. मात्र, 2 हजार रुपये देखील माफ होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती नरेश दहिबावकर यांनी दिली.  

विसर्जनदिवशी सुट्टी मिळावी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 26 तारखेला मराठा बांधव मुंबईत येणार आहेत, त्याचे नियोजन देखील होणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून गणेश विसर्जनादिवशी मुंबईत सुट्टी मिळत असताना यंदा ती रद्द केली आहे. खासगी लोकांचा अनंत चतुर्दशी संदर्भात विचार करा आणि सुट्टी जाहीर करा, अशी मागणीही गणेश मंडळांनी केली आहे. 

हेही वाचा

पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालयात आज काय घडलं?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget