एक्स्प्लोर
बँडस्टँडला हायटाईडमध्ये अडकलेल्या अकरा जणांना वाचवण्यात यश
मुंबईत वांद्रेच्या बँडस्टँड परिसरातील ताज हॉटेलसमोर बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यात आलं आहे. चार मुली आणि सात मुलं बुडत असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली.
मुंबई : समुद्रकिनारी निवांत बसणाऱ्यांना काळजी घ्यायला भाग पाडणारी बातमी आहे. मुंबईत वांद्रेच्या बँडस्टँड परिसरातील ताज हॉटेलसमोर बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यात आलं आहे.
चार मुली आणि सात मुलं बुडत असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली. त्यानंतर स्पीड बोटच्या सहाय्याने त्या अकरा जणांना सुखरूप बाहेर काढलं.
पोलीस कर्मचारी अजित शिंदे, समीर भोईर आणि नंदीरबाळ शिंदे या तिघांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्या तरुणांना वाचवलं. बँडस्टँड या ठिकाणी तरुण, तरुणी नेहमीच बसत असतात. मात्र आज काही जण अचानक हायटाईडमध्ये अडकले. सुदैवाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने पाण्यात उडी घेतली आणि सर्वांना सुखरुप बाहेर काढलं.Stuck in a high tide on the rocks at Bandra Bandstand, 4 girls and 7 boys were rescued by Constables Ajit Shinde, Samir Bhoir & Nandirbal Shinde while they were on a routine marine patrol. #MumbaiFirst pic.twitter.com/0DTyERa8Tw
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 4, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement