एक्स्प्लोर
ठाणे जिल्ह्यातील नारीवली गावाकऱ्यांचं 100 टक्के लसीकरण पूर्ण, राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून विशेष सन्मान
कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एक महत्त्वाचं शस्त्र असून याच्या मदतीनेच कोरोनाला आळा घालता येऊ शकतो, त्यामुळे शासनाकडून लसीकरण मोहिमेवर भर देण्य़ात येत आहे.
ठाणे : शहरी भागात covid-19 संसर्गाच्या केसेस झपाट्याने वाढत असताना ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत मुरबाड तालुक्यातील नारिवली ग्रामपंचायतीचा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत आज हा सत्कार समारंभ झाला. नारिवली गावाच्या सरपंच देवयानी भोईर, उपसरपंच कल्पेश सोरसे, ग्रामसेवक निलेश गोरले, सदस्य योगेश भोईर यांनी हा सत्कार स्विकारला.
नारिवली ग्रामपंचायतीने गावातील सर्व नागरिकांना 100 टक्के पहिला डोस तर 98 टक्के दुसरा डोस दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. "देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोवीड प्रतिबंध लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला आहे.
यापुढेही जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती लसीकरण मोहिमेत चांगले काम करतील, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे", असे उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी या कार्यक्रमात सांगितले. मुरबाड तालुक्यातील गावे एकमेकांपासून प्रचंड लांब अंतरावर असलेली आहेत अशा गावांमध्ये मिळेल त्या साधनांनी प्रसंगी ताई चालत जाऊन ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवक लसीकरण करत आहेत त्याचाच परिणाम म्हणून या गावाचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड अशा ग्रामीण भागात प्रत्येक गावाचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा -
- Mumbai: पुन्हा लॉकडाऊन? मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, आज 3671 नव्या रुग्णांची नोंद
- ओमायक्रॉनचं संकट तीनपटीनं वाढतंय, जुनी जम्बो कोव्हिड सेंटर कार्यरत करणार; महापौरांची माहिती
- Omicron Community Spread? : काळजी घ्या, धोका वाढतोय! मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचा समूह संसर्ग?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement