एक्स्प्लोर
Advertisement
रायगडवरुन शेतकऱ्यांसाठी दीड लाख भाकऱ्यांची शिदोरी
8 दिवसाची चटणी भाकरी घेऊन हे शेतकरी मुंबईत धडकले. मात्र आज या शेतकऱ्यांना रायगडवरुन जेवण आलं.
मुंबई: गेल्या आठ दिवसांपासून 200 किमी अंतर पायी चालत, किसान सभेचा लाँग मार्च आज विधानभवनावर धडकला. नाशिकपासून मुंबईपर्यंत हजारो शेतकरी चालत आले. ना रक्ताळलेल्या पायाची, ना उन वाऱ्याची तमा बाळगता, शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी चालत राहिले.
8 दिवसाची चटणी भाकरी घेऊन हे शेतकरी मुंबईत धडकले. मात्र आज या शेतकऱ्यांना रायगडवरुन जेवण आलं. रायगडचे आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या शेतकरी कामगार पक्षाने, मोर्चेकरी शेतकऱ्यांना जवळपास दीड लाख भाकरी आणि सुकटचं वाटप केलं.
रायगडवरुन आलेली ही दीडलाख भाकरींची शिदोरी आझाद मैदानावर शेतकऱ्यांना वाटण्यात आली.
तहान भूक हरलेल्या शेतकऱ्यांसाठी या शिदोरीने तोंडाला चव आणल्याचा भाव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
महापालिकेचीही जय्यत तयारी
दरम्यान, आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात शेतकरी आल्याने, महापालिकेनेही जय्यत तयारी केली. शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था, फिरती शौचालयं, तसंच उपचारासाठी अनेक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
मुस्लिम संघटनांचीही मदतीचा हात
महापालिकेशिवाय विविध संघटनांनीही शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. मुस्लिम संघटनांनी शेतकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटं वाटली.
लाल वादळ आझाद मैदानावर
विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे. आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास किसान सभेचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं.
सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. परीक्षांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी रात्रीत कूच करण्याचा निर्णय घेतला.
आज दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते आंदोलकांनी मान्य केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement