एक्स्प्लोर

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक

मोबाईलवर चित्रीकरणाच्या कारणावरून दोन जिवलग विद्यार्थी मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका मित्राने आपल्याच विद्यार्थी मित्राच्या पोटात चाकूने भोसकून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला

सोलापूर : प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मोबाईलवर शूटिंग करण्यावरून 12 वीच्या दोन विद्यार्थ्यात वाद होऊन मित्रानेच मित्राला चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार सांगोल्यातून (solapur) समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आरोपींना 7 दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्याला सांगली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सांगोला तालुक्यातील कोळे येथे प्रजासत्ताकदिनी कार्यक्रम संपल्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला.

मोबाईलवर चित्रीकरणाच्या कारणावरून दोन जिवलग विद्यार्थी मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका मित्राने आपल्याच विद्यार्थी मित्राच्या पोटात चाकूने भोसकून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या पोटात चाकू तसाच ठेवून दोघांनी तेथून धूम ठोकली.दरम्यान जखमी विद्यार्थ्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी 9 च्या सुमारास शाळेच्या गेटसमोर घडल्याने विद्यार्थ्यांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. युवराज सुभाष आलदर (वय -१९ रा. कोळे नाथबाबा वस्ती ता. सांगोला ) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत, वडील सुभाष सदा आलदर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी शंकर मारुती घाडगे ( रा. कोळे ) समाधान श्रीमंत होनमाने (रा. जुनोनी ता सांगोला ) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
    
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांनी सांगितले आहे. फिर्यादी, सुभाष आलदर यांचा मुलगा युवराज व त्याचा मित्र शंकर घाडगे हे दोघेही बारावीच्या एकाच वर्गात शिक्षण घेतात. युवराज हा प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता शाळेवर आला होता . यावेळी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थी - विद्यार्थिनी शाळेच्या गेटमधून आपापल्या घराकडे निघाले होते .  अचानक शंकर याने शाळाबाह्य समाधान होनमाने यास बोलवून युवराज यास शिवीगाळ दमदाटी करुन' तू मोबाईलवर कोणाचे चित्रीकरण केले ' याचा जाब विचारत सोबत आणलेला चाकू दोघांनी मिळून युवराज याच्या पोटात भोसकून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी युवराज याच्या पोटात भोसकलेल्या चाकूसह त्यास तातडीने उपचारा करता सांगली येथील खाजगी रुग्णालयात हलवले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी करीत असून प्रजासत्ताक दिनीच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे मुलांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण आहे. 

हेही वाचा

ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Embed widget