एक्स्प्लोर
बनावट क्रेडिट-डेबिट कार्ड बनवणाऱ्या हायटेक रॅकेटचा पर्दाफाश
अटक झालेल्या आरोपींकडून अनेक बँक खातेदारांच्या क्रेडिट-डेबिट कार्ड डाटा सापडला आहे.या सहाही आरोपींचे क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचे पोलिसानी सांगितले.

मुंबई : भारतीय आणि विदेशी बँक खाते धारकांचे डेटा चोरुन क्लोनिंग बनावट डेबिट-क्रेडिट कार्ड बनवणाऱ्या हायटेक रॅकेटचा मुंबई पोलिसानी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी 6 आरोपींना अटक केली आहे. मुंबईतल्या नागपाडा पोलीस ठाण्यात गीता चौहाण या महिलेने या बाबतची तक्रार नोंदवली होती. तक्रारदार गीता चौहाण त्यांच्या नोकरीसाठी ग्रीसमध्ये होत्या. 7 जून ते 11 जून दरम्यान त्यांच्या डेबिट कार्ड खात्यातून 2,16,000 रुपये अचानक गायब झाले. पैसे जेव्हा गायब झाले त्यावेळी त्यांचे डेबिट कार्ड त्यांच्याकडे होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून 6 आरोपींना अटक केली. कस्तूराम सोलंकी, मदनकुमार सुन्देसा, रमेश चन्द्रन, दीपक गहलोत, चंदनसिंग राव आणि कोलावोले हकीम ही या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम 411, 420, 66(डी) , 66(सी) इनफार्मेशन टेक्नोलॉजी एक्ट अंतर्गत पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कारवाई केली आहे. अटक झालेल्या आरोपींकडून अनेक बँक खातेदारांच्या क्रेडिट-डेबिट कार्ड डाटा सापडला आहे.या सहाही आरोपींचे क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचे पोलिसानी सांगितले.
Before You Go
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















