एक्स्प्लोर
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचा मासिक पास 25 ते 50 रुपयांनी महागला
30 दिवसांच्या मेट्रोच्या मासिक पासची किंमत वाढली आहे. 30 दिवसांचा हा पास मेट्रोच्या 45 फेऱ्यांसाठी वैध असतो. नव्या दरांनुसार आता 775, 1150 आणि 1375 रुपये अनुक्रमे 2-5 किमी, 5-8 किमी आणि 8 किमी अंतरासाठी लागणार आहेत.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई: बहुचर्चित मुंबई मेट्रोच्या मासिक पासात अखेर वाढ करण्यात आली आहे. मेट्रोची ही दरवाढ 25 ते 50 रुपयांनी करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. पण दुसरीकडे मेट्रोने प्रवाशांना कॅशबॅकची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
30 दिवसांच्या मेट्रोच्या मासिक पासची किंमत वाढली आहे. 30 दिवसांचा हा पास मेट्रोच्या 45 फेऱ्यांसाठी वैध असतो. नव्या दरांनुसार आता 775, 1150 आणि 1375 रुपये अनुक्रमे 2-5 किमी, 5-8 किमी आणि 8 किमी अंतरासाठी लागणार आहेत.
तुम्ही तुमचे मासिक पास एसव्हीपी (SVP) ने रिचार्ज केल्यास तुम्हाला 2 ते 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजे 800 रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला 80 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
जास्तीत जास्त स्मार्टकार्डचा वापर प्रवाशांनी करावा म्हणून ही कॅशबॅक योजना सुरु केली असल्याचे मुंबई मेट्रोच्या प्रवक्त्यांनी म्हटले. तसेच सध्या मुंबई मेट्रो ही काही प्रमाणात तोट्यात चालली आहे. म्हणून या मासिक पासचे दर वाढवण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज