एक्स्प्लोर

Mumbai Local : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धक्काबुक्की, दारात उभा असलेला जवान खाली कोसळला; उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Local Accident : गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

Mumbai Local Accident : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या गर्दीने पुन्हा एकदा एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना (Mumbai Local Train Accident) घडली आहे. गणेश जगदाळे असे या 31 वर्षीय मृत जवानाचे नाव असून ते दहिसर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते ड्युटी संपवून दहिसर स्थानकातून नायगावला जाण्यासाठी लोकल पकडली. मात्र प्रचंड गर्दीमुळे ते दरवाज्याजवळ उभे असताना मालाड-गोरेगाव (Malad Goregaon) दरम्यान धक्काबुक्की झाली आणि ते सरळ रुळावर पडले. यात त्यांना गंभीर दुखापत (Local Train Accident) झाली आणि त्यामुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Andheri Crime : आरे कॉलनीत नृत्यांगनेवर बलात्कार; नृत्य प्रशिक्षक, इव्हेंट ऑर्गनायझरला पोलिसांनी केली अटक

आरे पोलिसांनी 22 वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या तरुणाला एका 32 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. पीडिता अंधेरीत राहणारी असून ती चित्रपट आणि स्टेज शोमध्ये पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणून काम करते. आरोपी हा मालाडचा रहिवासी असून डान्स कोच आणि कार्यक्रम आयोजक आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी भा.न्या.सं.च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पूरग्रस्तांसाठी पोलिसांची सहा लाख रुपयांची मदत (Police Help for Flood Victims)

अतिवृष्टीने बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीनंतर सामाजिक जबाबदारी ओळखून बीड जिल्हा पोलीस दलाने पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन या उपक्रमाची सुरुवात करत आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी एकत्र येत एकूण 6 लाख 39 हजारांचा निधी गोळा केला. हा संपूर्ण निधी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द करण्यात आलाय. पोलिस दलाच्या या कृतीतून 'जनतेसाठी पोलिस' हा संदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही बीड पोलिसांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.

आणखी वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar Politics: पुण्यात बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र
Monsoon Magic: 'अहिल्यानगरचं कासपठार' फुललं! Bhandardara च्या घाटमाथ्यावर रानफुलांचा उत्सव
Bhandara Protest: 'आता आश्वासन नको, थेट निर्णय घ्या!', Gosikhurd प्रकल्पग्रस्त आक्रमक
Thackeray Brothers: 'भेट कौटुंबिक, पण चर्चा राजकीय?' Raj Thackeray यांच्या भेटीने चर्चांना उधाण
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 12 OCT 2025 : 3 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Auto Rickshaw Accident video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो,
Video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो, "पण मी काय केलं, माझा काय दोष?"
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
Nora Fatehi Video: नोरा फतेहीचा एकवेळ डान्स परवडला, पण डोक्यात मुंग्या येणारं ते इंग्रजी तेवढं नको! त्या व्हायरल व्हिडिओची चर्चा
Video: नोरा फतेहीचा एकवेळ डान्स परवडला, पण डोक्यात मुंग्या येणारं ते इंग्रजी तेवढं नको! त्या व्हायरल व्हिडिओची चर्चा
दोन वर्षांपूर्वी लग्न, किरकोळ कारणातून वाद, नवऱ्यानं रेल्वेखाली उडी घेतली, बायकोला समजातच गळ्याला दोरी लावली; फक्त तासाभरात निशा-प्रमोदच्या संसाराची राखरांगोळी
दोन वर्षांपूर्वी लग्न, किरकोळ कारणातून वाद, नवऱ्यानं रेल्वेखाली उडी घेतली, बायकोला समजातच गळ्याला दोरी लावली; फक्त तासाभरात निशा-प्रमोदच्या संसाराची राखरांगोळी
Embed widget