एक्स्प्लोर

Motorola Edge 40 Launched : मोटोरोलाचा Motorola Edge 40 स्मार्टफोन आज लाँच, या स्मार्टफोनमध्ये 'ही' भन्नाट फिचर्स

मोटोरोला कंपनीने Motorola Edge 40 मोबाईल फोन आज भारतात लाँच केला आहे. हा मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांना फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Motorola Edge 40 Launched :  मोबाईल कंपन्यातील नवाजलेल्या मोटोरोला कंपनीने आज त्यांचा मध्यम किमतीचा मोबाईल फोन Motorola Edge 40 लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mah इतक्या क्षमतेची बॅटरी आहे. यामध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर, 8GB LPDDR4X रॅम आणि 50 मेगापिक्सलचा  प्रायमरी कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये इतर अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आली आहेत. हा फोन आजपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनच्या किमती आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊया...

या स्मार्टफोनची किंमत 

मोटोरोला कंपनीने motorola-edge-40 मोबाईलला  8GB LPDDR4X रॅम आणि 256 च्या इंटरनल स्टोरेजसोबत लाँच केला आहे. या फोनची मूळ किमत 29,999 रूपये इतकी असून फोन ऑफर्ससह  27,999 रूपये इतक्या किमतीत उपलब्ध आहे. हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये  ग्राहकांना ग्रीन, ब्लू आणि ब्लॅक या कलर व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मोबाईल फोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. या फोनवर एक्सचेंज ऑफरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या फोनमध्ये 'ही' आहेत भन्नाट फिचर्स 

मोटोरोलाने त्यांच्या नवीन मोबाईनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स दिले आहेत. या मोबाईलमध्ये 6.55 इंच FHD आणि कर्व्ड OLED डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे.हा डिस्प्ले 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. यामुळे डिस्प्लेची गुणवत्ता चांगली मिळते. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी मोबाईलमध्ये  ड्युल कॅमेरा सेटअप आणि 50 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा  आणि 13 मेगापिक्सलचा दर्जेदारअल्ट्रा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच समोरील बाजूला सेल्फी फोटोज आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलचे चांगले फोटोज काढता येणार आहे. या मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर, 8GB LPDDR4X रॅम आणि 256GBUFS 3.1 स्टोरेज सपोर्ट मिळणार आहे. Motorola Edge 40 मध्ये 5000 mah इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून 68 वॅटच्या फास्ट चार्जिंगसोबत मिळणार आहे. हा मोबाईल IP68 च्या रेटिंगसोबत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे माती, धूळ आणि पाण्यातही खराब  होत नाही. मोटारोलाने त्यांच्या एक ट्विटमध्ये सांगितले की, हा मोबाईल 30 मिनिटापर्यंत पाण्यात राहिला तरी फोनला काहीच होत नाही.

सॅमसंगने लाँच केला बजेट फ्रेंडली फोन

अलिकडेच  मोबाईल कंपन्यांतील आघाडीची कंपनी सँमसंगने आपला बजेट फ्रेंडली मोबाईल भारतात लाँच केला आहे. कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी A14 मध्ये  4 जीबी रॅम आणि इंटरनल स्टोरेज 64 जीबी व 4 जीबी रॅम आणि 128 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हा  मोबाईल अनुक्रमे 13,999 रुपये  आणि 14,999 रुपये इतक्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5000mah इतक्या क्षमतेची बॅटरी, Exynos 850 चिपसेट  आणि लेटेस्ट अॅण्ड्रॉईड 13 ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध करून दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget