एक्स्प्लोर
Advertisement
'बाप शेर तो बेटा सवा शेर', मंत्री जयंत पाटलांचा 'हिरो' टायगरसोबत सेल्फी
मुंबई मॅरेथॉनवर यंदा इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. डेरारा हरिसा विजेता ठरला तर महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंनी ठसा उमटवला.
मुंबई : मंत्री आणि नेत्यांचे सेल्फी काढण्याची क्रेझ असते. पण जेव्हा मंत्र्यांना पण चित्रपट कलाकार बरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी टायगर श्रॉफ यांच्याबरोबर सेल्फी काढला. दरवर्षी जानेवारी महिन्यात मुंबई मॅरेथॉन उत्साहात पार पाडली जाते. या स्पर्धेला मुख्यमंत्री यांच्याबरोबर इतर मंत्री तर हजेरी लावतातच. पण बॉलिवूड मधील कलाकार देखील सहभागी होतात. यावर्षी टायगर श्रॉफ मुंबई टाटा मॅरेथॉनचे अतिथी म्हणून उपस्थित होता. तरुण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि टायगर श्रॉफ यांची मैत्री तर सर्वश्रुत आहेच.
नेहमी मंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्याची क्रेझ असते पण आज मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांना तरुण हिरो टायगर श्रॉफ याच्याबरोबर सेल्फी काढला. आणि त्यांनी ट्विटरवर सेल्फी टाकत टाकत बाप शेर तो बेटा सव्वा शेर अशी टिप्पणी केली आहे. जयंत पाटील आणि अभिनेता जॅकी श्राफ यांचे जुने संबंध आहेत, त्याच्या मुलाबरोबर फोटो काढण्याचा मोह जयंत पाटील यांना आज आवरला नाही.
सालाबादप्रमाणे याही वर्षी मुंबईत #MumbaiMarathon स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह यावर्षीच्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन 2020' शर्यतीला फ्लॅग ऑफ केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला, असे जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधल्या विविध शर्यतींना जबरदस्त प्रतिसाद लाभला. हौशी आणि एलिट धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरुवात झाली. या तीन शर्यतींसह दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याशिवाय सर्वसामान्यांसाठी सहा किलोमीटर्स अंतराच्या ड्रीम रनचाही मुंबई मॅरेथॉनच्या कार्यक्रमात समावेश होता.
इथिओपियाच्या डेरारा हुरिसा आणि अमाने बेरिसोला विजेतेपद
इथिओपियाच्या डेरारा हुरिसा आणि अमाने बेरिसो या धावपटूंनी मुंबई मॅरेथॉनमधल्या एलिट शर्यतीचं विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम गाजवला. 42.195 किलोमीटर्स अंतराच्या या शर्यतीत देशविदेशातल्या सर्वोत्तम धावपटूंचा समावेश होता. पुरुष विजेत्या हुरिसानं दोन तास आठ मिनिटं आणि नऊ सेकंद अशी विक्रमी वेळ दिली. महिला विजेत्या बेरिसोनं दोन तास 24 मिनिटं आणि 51 सेकंद वेळत अंतिम रेषा पार केली. पुरुषांच्या शर्यतीवर इथिओपियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. इथिओपियाचा अयेले अबशेरो दुसरा आणि इथिओपियाचाच बिरहानू टेशोम तिसरा आला. महिलांच्या शर्यतीत केनियाची रोढा जेपकोरिर दुसरी, तर इथिओपियाची हॅवेन हायलू तिसरी आली.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याच्या कामाचं मुल्यमापन होणार : जयंत पाटील
Jayant Patil Exclusive | तिनही पक्षाला समान खाती, सर्वांचं समाधान झालंय : जयंत पाटील |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement