Sai Tamhankar : 'मी शिवाली, मी भिवाली, मी पावली, मी पडली'; सई ताम्हणकरचा ब्यूटी इन ब्लॅक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् धम्माल मिम्सचा पूरच आला
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या नेटकऱ्यांनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.
Sai Tamhankar Troll : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नुकतचं तिने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील तिचा ग्लॅमरस लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला तर नेटकऱ्यांनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं.
'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यातील फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. पुरस्कार सोहळ्यातील ग्लॅमरस लुकवर सईने खास फोटोशूट केलं आहे. थाई हाई स्लिट स्कर्ट आणि डिझायनर टॉपमध्ये सई खूपच हटके दिसत आहे.
View this post on Instagram
सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी धमाल कमेंट्स केल्या आहेत. तसेच तिच्या फोटोंचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हा नुकत्याच पुसलेल्या लादीवरुन कोणीतरी पाय देऊन जातो, पडलेले पैसे गपचूप उचलताना मी, मी शिवाली, मी भिवाली, मी पावली, मी पडली, भावा लाईट बंद कर ना, गरीबांची सनी लिओनी, लेग्ज वर्कआऊट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी, पैसे उचलताना गुडघा चमकला काय, असे धमाल मीम्स नेटकऱ्यांनी बनवले आहेत.
View this post on Instagram
सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सईचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. मराठी मालिका आणि सिनेमांसह सईने वेबसीरिजमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
View this post on Instagram
सई ताम्हणकर सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. सईचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते.
संबंधित बातम्या