आपलं रक्त थंड पडलं नाही हे जर दाखवुन द्यायचे असेल तर...; संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्त मराठा क्रांती मोर्चाचे जाहीर आवाहन
Baramati: बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) येत्या 9 मार्चला संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देत विविध मागण्यासाठी मोर्च्याचे आयोजन केले आहे.

बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन (Santosh Deshmukh murder case) राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही सहआरोपी करा इत्यादि मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने होत आहेत.
दरम्यान, बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) येत्या 9 मार्चला संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देत विविध मागण्यासाठी मोर्च्याचे आयोजन केले आहे. मोठ्या संख्येने सर्वधर्मीय मोर्चाला नागरिकांनी उपस्थित राहावं अशी विनंती, या आवाहनातून करण्यात आले आहे. आज शांत राहीलो तर हि वेळ आपल्या कुटुंबावर यायला वेळ लागणार नाही, त्यामुळे आज या घटणेच्या निषेधार्थ एकत्र येण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
आपलं रक्त थंड पडलं नाही हे जर दाखवुन द्यायचे असेल तर...
आपलं रक्त थंड पडलं नाही हे जर संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना दाखवुन द्यायचे असेल तर, आपण देशमुख कुटुंबीयासोबत रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता मोर्च्याला सहकुटुंबासह उपस्थित राहून, "होय, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत असुन आरोपी फासावर लटकेपर्यंत शांत बसणार नाही" हे दाखवून देऊ. आपणही आपल्या संबंधित लोकांना संपर्क करून सर्वधर्मीय मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी विनंती करावी, अशा शब्दात बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाने आवाहन केलं आहे. शांत राहीलो तर हि वेळ आपल्या कुटुंबावर यायला वेळ लागणार नाही, असेही यात म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्येत धनंजय मुंडेंना सह आरोपी करा- सकल मराठा समाज
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली आणि या हत्या प्रकरणात केवळ वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारच नाही तर धनंजय मुंडे यांचाही सहभाग असल्याचा आरोप करत या हत्या प्रकरणात त्यांना ही सह आरोपी करा, या मागणीसाठी आज(7 मार्च) परभणीचे सेलू शहर आणि तालुका बंद करण्यात आलाय.
शिवाय सकल मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. सकाळपासूनच सेलू बंद असून बाजारपेठ पूर्णतः कडकडीत बंद करण्यात आली आहे दुसरीकडे या बंदमुळे शहरासह तालुक्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

