Manoj Jarange Maratha Morcha: राधाकृष्ण विखे पाटील यांचा मनोज जरांगें फोन, शिष्टमंडळ शिवनेरी इथे चर्चेसाठी येणार
Manoj Jarange Maratha Morcha: मराठा आरक्षण (Maratha Reservation) मंत्रीमंडळ उपसमितचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांचा मनोज जरांगेंना फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange Maratha Morcha: मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमीतीच्या बैठक पार पडल्यानंतर सरकारकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आंदोलनावर ठाम असून ते सध्या मुंबईच्या दिशेने माग्रस्त होत आहे. अशातच या आंदोलनाच्या अनुषंगाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) मंत्रीमंडळ उपसमितचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांचा मनोज जरांगेंना फोन आल्याची माहिती समोर आली आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक शिष्टमंडळ शिवनेरी इथे चर्चेसाठी येणार असल्याची माहिती स्व:त मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, काल झालेल्या उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत सगेसोयरेबाबत ज्या मागण्या आहेत, त्याबाबत आम्ही चर्चा केल्याचे विखे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणावरील शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. मनोज जरांगेंनी याबाबतची मागणी केली होती. ती मागणी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत मान्य झाली आहे. असेही ते म्हणाले होते. दरम्यान आजच्या शिवनेरी इथे शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार असून यात काही तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माजलगावमधून बाराशे गाड्या घेऊन मराठा समाजबांधव अंतरवेलीकडे रवाना
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या माजलगाव तालुक्यातून बाराशे गाड्या अंतरवेलीकडे रवाना झाल्या आहेत. समाज बांधवांनी वर्गणी करून या सर्व गाड्यांची व्यवस्था केली असून हजारो मराठा समाज बांधव हे या वाहनांमधून अंतरवेली पासून जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. इतकच नाही तर पुढील पंधरा दिवस पुरेल इतकी जेवणाची व्यवस्था ही त्यांनी केल्याचे यावेळी मराठा बांधवांकडून सांगण्यात आले.
ज्ञानेश्वरी मुंडे यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा
मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनाला माझा आणि माझ्या परिवाराचा पाठिंबा असल्याचा ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत. यामुळे सर्वांनी त्यांच्या या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे.
लेकरांचा बाप मारला त्यावेळेस लक्ष्मण हाके कुठे होते असा सवालही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी विचारला आहे. मी ओबीसी असतानाही त्यांनी न्यायाच्या लढाईत साथ दिली नाही.लक्ष्मण हाके हे समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी केलाय. मनोज जरांगे पाटील हे सगळ्या समाजासाठी आवश्यक आहेत.या आधीच ओबीसींना गोपीनाथ मुंडेंनी आरक्षण दिल्याची आठवण देखील हाके यांना करून दिली आहे.
आणखी वाचा
























