Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वर्ष वाया घालवणं, त्यांनी मजा करा, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही; मनोज जरांगेचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांनी तिकडे मजा कर, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही. असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यावर बोलणे म्हणजे वर्ष वाया जाणे आहे. ते बोलायच्या कामाचे नाही. त्यांनी तिकडे मजा कर, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही. असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी टीका केली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) टीका केली आहे. अंबानी यांनी मराठ्यांना त्रास दिलाय. त्यांची सून मराठ्यांना काही तरी म्हणाली असं कळतंय. जर मराठ्यांना काही म्हणाले असेल तर मग जियो नाही आणि काही नाही. दुसरी एक ती शर्मा आहे की कुणी आहे. तुम्ही पाहुणे आहात, अन्यथा पूर्ण मुंबईचे बेट मोकळे करेल. तुम्हाला सुरक्षित वाटतं नसेल तर समुद्रात घर बांधा. अंबानी यांना सांगावं मुंबईचे गरीब मालक आहेत. इथ नाटक करायचं नाही.मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुट्टी नाही. असा सज्जड दमही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.
हवं तर मला घरातील कुंकू आणून लावले तरी चालेल, पण...
आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा नाही. आम्ही आता खुश झालो आहोत. आम्ही आरक्षण मिळवले आहे. GR निघाला म्हणजे हि लहान गोष्ट नाही. मी महाराष्ट्रातील गरीब मराठा लोकांना सांगतो की कुणीही हार, पुष्पगुच्छ, शाल असे आणून खर्च करू नका, आपण हार-तुरे आणि शाल घेऊ नये, आपला जो वायफळ खर्च होतोय त्यातून गरिबांना मदत करू. हवं तर मला घरातील कुंकू आणून लावले तरी चालेल. असा सल्लाही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
.....अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आम्हाला यावं लागेल- मनोज जरांगे पाटील
देवाभाऊ आशयाचे कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पियन करा, आम्ही तुमचे आभार आणि कौतुक करू. मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या. तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. शिंदे समितीस बढती दिल्यास सर्व विभागात नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. सरकारने कामे केल्यास आम्ही कौतुकच करू. मात्र आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आम्हाला यावं लागेल. शिंदे हे मोकळा धाकळा माणूस आहे, ते तसे करणार नाहीत. GR ओके आहे. GR कसा ही काढला तरी नंतर दुरुस्ती करावी लागते. गैरसमज पसरवून कुणाचे ऐकू नका. कसलेही येतात आणि बरळतात, त्यांनीच नुकसान केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही. अशी प्रतिक्रिया हि मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसी मोर्चासंदर्भात आमचं त्याच्या विषयी काही म्हणणे नाही- मनोज जरांगे पाटील
नागपूरमध्ये सुरु असलेल्या ओबीसी मोर्चा संदर्भात आमचं त्याच्या विषयी काही म्हणणे नाही. आम्ही सरकारशी भांडतोय. आम्हाला जे हवे होते ते आम्ही मिळवले असून ठासून सांगत आहे. मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढा. तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमचं. आम्हाला आरक्षण मिळाले त्यामुळे आता लढायला काय बाकी आहे? असेही जरांगे पाटील म्हणाले. सरकारने शब्द दिलाय, सुधारित GR काढणार. इथ आल्यास तुम्हाला काय अडचणी येतात. तुम्ही GR किती ही चांगला काढा, अडचणी येतात. सुधारित GR काढावाच लागतो. GR काढल्यास बदल करावा लागतो. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
























