एक्स्प्लोर
Advertisement
अनोखी श्रमवंदना, नगरमधील उद्योजकांकडून कर्मचाऱ्यांना कार भेट
अहमदनगर : अहमदनगरमधील दोन उद्योजकांनी आपल्या 12 कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्यानिमित्त चक्क गाड्या भेट दिल्या. झेन इलेक्ट्रिक कंपनीचे संचालक मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर यांनी कर्मचाऱ्यांना गाड्या भेट देऊन त्यांना अनोखी श्रमवंदना दिली.
ही भेट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक आणि श्रद्धापूर्वक केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर यांनी दिली.
‘झेन’ च्या स्थापनेला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली. अभियंते असलेल्या मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर यांनी मेहनत, जिद्द, धाडस आणि कल्पकतेच्या जोरावर उद्योग निर्माण केला आणि यशस्वीही झाले. शिवाय अनेक सामाजिक संघटनांना आर्थिक मदतही ते करतात.
सध्याची मंदी, अहमदनगरच्या उद्योग क्षेत्रासमोरील गंभीर प्रश्नांमुळे उद्योग जगतात मोठी अस्वस्थता आणि असुरक्षितता आहे. अशा वातावरणातही राजीव गुजर आणि मिलिंद कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांना गाड्या भेट देऊन त्यांना एकप्रकारे श्रमवंदना दिली आहे.
याआधी दिवाळीच्या मुहूर्तावर गुजरातच्या सूरतमधील सावजी ढोलकिया या व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांना बंपर बोनस दिला होता. ढोलकियांनी 1260 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केली, तर 400 कर्मचाऱ्यांना घरखरेदी करण्यात मदत केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement