एक्स्प्लोर

लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, जालन्यात बनावट लग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या

मुलींची संख्या घटत चालल्याने उपवर मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिकट बनला आहे. याच बिकट परिस्थितीचा फायदा घेत अनेकांनी खोटी लग्न लावून पैसे उकळण्याचा धंदा सुरु केला आहे. अशाच एका गुन्ह्याची माहिती जालन्यातील चंदनजीरा पोलीस स्टेशनला मिळाली आणि एक धक्कादायक गोष्ट पोलिसांसमोर आली. पोलिसांनी बनावट लग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

जालना : गुजरात राज्यातील जुनागड येथील रहिवासी पियुष वसंत यांनी 8 जानेवारी रोजी जालन्यातील चांदनजीरा पोलीस ठाण्यात एक तक्रार केली. या तक्रारीमध्ये त्यांनी लग्न करुन आणलेल्या तीन मुलींनी गाडीतील रक्कम आणि मोबाईल असा 30 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची आणि फसवणूक केल्याची तक्रार केली. त्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली ज्यात त्यांना पुढील धक्कादायक माहिती मिळाली.

फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या नात्यातील काही जण तीन तरुणांच्या लग्नासाठी मुली शोधत होते. मात्र गुजरात मध्ये मुलगी मिळत नसल्याने त्यांनी महाराष्ट्रातील एका पुरुष एजंटला संपर्क केला. त्याने जालन्यातील एजंटच्या माध्यमातून मुलींचा शोध सुरु केला. यावेळी जालन्यातील एजंटने आमच्याकडे तीन अनाथ मुली असून त्या गरीब आहेत. त्यांच्या लग्नासाठी मुलं शोधत असल्याचे सांगितले. दरम्यान या मुलींना पहिल्यानंतर त्यांना पसंत करुन बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथे विधीनुसार तिन्ही तरुणांची या तरुणींसोबत लग्न लावण्यात आली. यासाठी एका वकिलामार्फत बॉण्ड देखील तयार करण्यात आला.

दरम्यान लग्नानंतर तिन्ही जोडपी गाडीने गुजरातला रवाना झाली. यावेळी नागेवाडी नाक्यावर मुलींनी लघुशंकेचं कारण सांगत गाडी थांबायला लावली. बराच वेळ होऊनही मुली न आल्याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता, त्यांनी फोनवर धमकी देण्यास सुरुवात केली. दरम्यान या मुलींनी गाडीतील रोख रक्कम आणि मोबाईल फोन लंपास केल्याचे लक्षात आल्यावर या मुलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.

लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, जालन्यात बनावट लग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यासाठी एका स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांना एका खबऱ्यामार्फत जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील एका महिलेची माहिती मिळाली. शिवाय जालना शहरात याच टोळीतील एक आरोपी महिला येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना भाऊ म्हणून मदत करणाऱ्या आरोपीलाही अटक केली असून इतर दोन मुलींना औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. तसंच मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक क्रूझर असा 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने आणखी किती जणांना फसवलं याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान न्यायालयाने त्यांना 19 जानेवारी रोजी दोन दिवसाची पोलीस कोठडी सूनवली आहे, ज्यात पोलिसांना या महिलांच्या टोळीने आणखी किती जणांना गंडवले हे स्पष्ट होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Akola News : शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Solanke on Beed Case| बीडमध्ये पैशाचा वापर करून गुंडगिरी, प्रकाश सोळंकेंचा जोरदार हल्लाबोलPrakash Mahajan on Beed|बीडमध्ये शस्त्राचे प्रदर्शन, स्वत:ची बंदूक पोलिसांकडे जमा करणार-प्रकाश महाजनSuresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Akola News : शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
IPO Update : ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल आता सर्वांच्या नजरा Unimech Aerospace IPO कडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओकडे सर्वांचं लक्ष, IPO तब्बल 174.93 पट सबस्क्राइब,GMP कितीवर पोहोचला?
Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
Embed widget