मुली भाव देत नाहीत म्हणून थेट आमदारांना पत्र लिहिणारा तरुण सापडला
रस्ते, पाणी, वीज किवा इतर मुलभूत सुविधांबाबतची मागणी लोकप्रतिनिधींकडे करणे अपेक्षित आहे. मात्र चंद्रपुरात मुली भाव देत नाहीत या समस्येकडे लक्ष देण्यासाठी एका तरुणाने आमदाराला पत्र लिहिलं होते.
चंद्रपूर : गर्लफ्रेंड मिळावी यासाठी आमदारांना पत्र लिहिणारा युवक अखेर सापडला आहे. पत्राखाली नाव असलेल्या भूषणच्या मित्रांनी सर्व कारभार केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. भूषणला याबाबत कल्पनाही नसल्याचे उघड झाले आहे.
राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथील भूषणच्या मित्रांनी त्याच्या नावाने गंमतीने लिहून व्हायरल केले होते. पत्र, आमदार सुभाष धोटे आपल्याला वडिलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केले आहे. या कृतीविषयी सर्वांना पश्चाताप असून त्यांनी माफी मागितली आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकर्त्यांनी युवक शोधून काढल्यावर आमदार धोटे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि युवकांशी संवाद साधला आहे.
आमदारांना लिहिलेलं व्हायरल पत्र जसंच्या तसं
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून देखील मला एकही गर्लफेन्ड नसणे चिंतेची बाब आहे. माझा आतविश्वास खचून गेला आहे. मी खेड्यागावातील असून राजुरा गडचांदूर येथे रोज फेरी मारत असते. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारु विकणाऱ्यांना, काऱ्या डोमऱ्यांना गर्लफेंड असते हे बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे की विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा.
मुली भाव देत नाहीत म्हणून चंद्रपुरातील नाराज तरूणाचं थेट आमदारांना पत्र
भूषण राठोड असा या पत्र लिहिणाऱ्या तरुणाचं नाव आहे. राजूरा विधानसभा क्षेत्रातील या तरुणाचे हे पत्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना लिहिलेल्या या पत्रात मुलगी पटत नसल्याची तक्रार या तरुणाने केली आहे. तालुक्यात भरभरून मुली आहेत मात्र एकही मुलगी पटत नसल्याची त्याची चिंता त्याने पत्रातून मांडली होती