Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांची बँक अधिकाऱ्यांशी चर्चा, 'या' बॅंकर्ससोबत केली चर्चा
संध्याकाळी सहा वाजता योगी आदित्यनाथ अनेक अभिनेते आणि बॉलिवूडमधील दिग्गजांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी काही बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केलीय. संध्याकाळी सहा वाजता योगी आदित्यनाथ अनेक अभिनेते आणि बॉलिवूडमधील दिग्गजांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोणत्या बॅंकर्ससोबत चर्चा?
- एसबीआय
- कोटक महिंद्रा बॅंक
- स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंक
- यस बॅंक
- एसआयडीबीआय
- इंडिया एक्सिम बॅंक
- आयडीबीआय बॅंक
- बॅंक ऑफ बरोडा
- बॅंक ऑफ महाराष्ट्र
- एचडीएफसी बॅंक
- नाबार्ड
- एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज)
- सीआयआय
- आयसीआयसीआय बॅंक
- बॅंक ऑफ इंडिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर पोहोचले. मागास असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून योगी आदित्यनाथ प्रयत्नशील आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग स्नेही वातावरण तयार व्हावं आणि गुंतवणूक वाढावी यासाठी योगींचा मुंबई दौरा आयोजित केलाय.
येणाऱ्या काही दिवसात मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मुंबईत उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. शिवाय उत्तर प्रदेश मध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्नही या दौऱ्याच्या माध्यमातून होत आहे. उत्तर प्रदेशात चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी उभारण्यात येत आहे. त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.
विरोधकांनी मात्र योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.