Yavatmal Washim : आजी-माजी पालकमंत्र्यांनी जिल्हा भकास केला; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचा घणाघात
आजी-माजी पालकमंत्री संजय राठोड आणि मदन येरावार यांनी विकासकामांत टक्केवारी घेऊन जिल्हा भकास केला आहे. असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी घणाघात केलाय.
Yavatmal washim Lok Sabha 2024 : यवतमाळच्या आजी-माजी पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आणि मदन येरावार (Madan Yerawar) यांनी विकासकामांत टक्केवारी घेऊन जिल्हा भकास केला आहे. असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी महायुती आणि सरकारवर घणाघात केला आहे. अमृत पाणीपुरवठा योजना, घनकचरा आणि रस्ते कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत (Yavatmal Washim Lok Sabha) महायुतीचा दारुण पराभव झाला असा गंभीर आरोपही संदीप बाजोरिया (Sandeep Bajoria) यांनी केला आहे. ह्या कामांची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील बाजोरिया यांनी केली.
मारहाणीचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत- संदीप बाजोरिया
एका तरुणीचे आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड आणि टक्केवारीमुळे मदन येरावार हे वादग्रस्त असून ते मतदारसंघाबाहेर नेते होऊ शकत नाही. माजी मंत्री मनोहर नाईक आणि आमदार इंद्रनील नाईक देखील नेतृत्व करू शकत नाही, नाईक पिता पुत्रांना येरावार यांच्या भावाने भूखंड माफियांद्वारे मारहाण केली असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा खळबळजनक दावा देखील संदीप बाजोरिया यांनी केला. आमदार मदन येरावार यांचा टक्केवार असा उल्लेख करीत ते जिथे क्लस्टर प्रमुख होते तिथे आणि सोलापूर निरीक्षक म्हणून सर्व ठिकाणी पराभूत झाले. असाही आरोप त्यांनी केलाय. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, पुसद आणि उमरखेड मतदारसंघ लढविण्याच्या तयारीत असल्याचे देखील बाजोरिया यांनी सांगितले.
यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदर म्हणून शिवसेनेच्या भावना गवळी या गेल्या 25 वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जात होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीला पराभवाला समोर जावे लागले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा पराभव महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी केलाय. या पराभवाचे विश्लेषण करत संदीप बाजोरिया यांनी यवतमाळचे आजी-माजी पालकमंत्री संजय राठोड आणि मदन येरावार यांना जबाबदार ठरवेल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या