एक्स्प्लोर

Bhavana Gawali: विजयाचा षटकार आणि विरोधकांना क्लीन बोल्ड करणार; यवतमाळ वाशिम मतदारसंघावरील दाव्यावर भावना गवळींचा पुनरुच्चार

Maharashtra Politics: यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून आपल्याच उमेदवारी मिळणार असून यावेळी आपण विजयाचा षटकार आणि  विरोधकांना क्लीनबोल्ड करू, असा निर्धार शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केला आहे.

Yavatmal Washim Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) पडघम वाजायला सुरुवात होण्यास आता अवघा काहीच अवधी शिल्लक राहिला आहे. असे असताना महायुतीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित यवतमाळ-वाशिम(Yavatmal Washim)लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून रस्सीखेच होताना दिसत आहे. अशातच या लोकसभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून यावेळी आपण विजयाचा षटकार मारू आणि  विरोधकांना क्लीनबोल्ड करू, असा निर्धार शिवसेनेच्या विद्यामान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी केला आहे.

आपल्या उमेदवारी बद्दल कुठलीही चिंता नाही. पक्षातील वरिष्ठ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्यच निर्णय घेतील आणि मला विजयाचा षटकार मारण्यासाठी आशिर्वाद देतील, असा विश्वास देखील भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी बोलतांना व्यक्त केलाय. भावना गवळी आज तातडीने भर दुपारी मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे त्या मुंबईला कोणाची भेट घेतात आणि यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim) मतदारसंघावर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

यवतमाळ वाशिम मतदारसंघावरील दाव्यावर पुनरुच्चार

महायुतीमध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपला दावा वेळोवेळी बोलून दाखवला आहे. तर याच जागेसाठी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना देखील उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.  त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे. साधारणतः एकाच आठवड्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपचे धक्कातंत्र?

'मै मेरी झांशी नहीं दूंगी' या ऐतिहासिक घोषणेचा जयघोष करत खासदार भावना गवळी यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार वारंवार केला आहे. असे असताना भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केलाय. भाजपचे हे धक्कातंत्र अजून संपले नसून विदर्भात आणखी 4 लोकसभा मतदारसंघात असेच धक्कातंत्र देण्याच्या तयारीत केंद्रीय नेतृत्व असल्याची माहिती आहे. त्यामध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संजय राठोड यांना महायुतीच्या माध्यमातून लोकसभेचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिहेरी लढतीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Embed widget