Yavatmal News : रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
Yavatmal News : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मेट या गावातून एक अपघातची बातमी समोर आली आहे. यात बैलगाडी तलावात शिरल्याने शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
Yavatmal News : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मेट या गावातून एक अपघातची (Accident) बातमी समोर आली आहे. यात शेतकरी बाप- लेकं आपली बैलगाडी घेऊन तलावालगत असलेल्या शेतात जात असताना बैलगाडी समोर अचानक काही रानडुकरांचा कळप बैलगाडी आला. त्यानंतर गाडीला जुंपलेले बैल बिथरल्याने बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बैलगाडी सरळ तलावात गेली. त्यामध्ये गाडी अंगावर पडल्याने तलावात बुडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.
यवतमाळच्या (Yavatmal News) उमरखेड तालुक्यातील मेट येथील वाघदरा तालावावर ही घटना घडलीय. या अपघात तलावातून बैल बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले, मात्र यात शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर अचानक झालेल्या बापलेकाच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अमोल देविदास चव्हाण आणि वीरू अमोल चव्हाण (रा . मेट) असे मृत झालेल्या बाप लेकाचे नाव आहे.
शेतकरी बाप-लेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत
ही घटना घडत असताना तलावाजवळील माळरानावर जनावर चारत असलेल्या युवराज राठोड यांनी पाहिल्यावर त्यांनी आरडा ओरड करून इतरांना बोलावलं. त्या ठिकाणी इतर शिवारातील व्यक्तीही तात्काळ धावून आले आणि त्यांनी तलावात जाऊन दोघांना बाहेर काढले. परंतु तोपर्यंत बापलेकांचा पाण्यात मृत्यू झाला होता. घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांना दिली असता, पोलीस निरीक्षक प्रेम कुमार केदार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करत या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे मेट गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
रेतीच्या टिप्परने दोन अल्पवयीन दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना चिरडलं
खामगाव शहरातील शेगाव मार्गावर रेती वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने दोन अल्पवयीन शाळकरी मुलांच्या दुचाकीला धडक दिली. यात एक शाळकरी विद्यार्थी जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झालाय. काल सायंकाळी झालेल्या या अपघाताने काही काळ खामगाव-शेगाव मार्गावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अपघात करून टिप्पर चालक आपलं वाहन घेऊन फरार झाला होता. मात्र पोलिसांनी काही वेळातच हे वाहन पकडून चालकाला ताब्यात घेतलंय. मात्र या आपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा